महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या १८ दिवसातच ते पुन्हा अयोध्येला आले आहेत. त्यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेत दौऱ्याला सुरुवात केली आहे. पांढरा धोती-कुर्ता, केशरी रंगाचं जॅकेट या पेहरावात ते दिसत आहेत. कडक सुरक्षाव्यवस्थेसह त्यांनी मध्य गेट क्रमांक ११ मधून मंदिरात प्रवेश केला. दर्शन झाल्यानंतर त्यांचा यापुढील कार्यक्रमही समोर आला आहे.
मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी अमिताभ बच्चन यांचं अभिनंदन केलं. ट्रस्टचे इतर पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. बिग बींनी रामललाची पूजा अर्चना केली. यानंतर आता ते एका ज्वेलरी शोरुमच्या उद्घाटनाला जाणार आहेत. तसेच कमिशनरचीही ते भेट घेणार आहेत. याशिवाय आजच ते अयोध्येतून परत मुंबईकडे रवाना होणार आहेत. हा त्यांचा एकदिवसीय दौरा आहे.
प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी अन् महानायक अमिताभ बच्चन यांचा Video व्हायरल
अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केली आहे. मुंबईच्या द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या 7 स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये त्यांनी एक प्लॉट खरेदी केला आहे. याठिकाणी बिग बी 10 हजार स्क्वेअर फूट मोठं घर बनवणार आहेत. या प्लॉटची किंमत तब्बल 14.5 कोटी रुपये आहे.