बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन लवकरच तमीळ चित्रपट 'उयन्थ्रा मनिथन'मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ते तब्बल दोन दशकानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री राम्या कृष्णन सोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटाचे हिंदी व तमीळ व्हर्जनचे दिग्दर्शन तमिलवानन यांनी केले आहे. हा अमिताभ बच्चन यांचा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पहिला सिनेमा आहे.
अमिताभ बच्चन व राम्या कृष्णन यांनी यापूर्वी हिंदी चित्रपट 'बडे मियां छोटे मियां'मध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे आता इतक्या वर्षांनंतर त्यांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक तमिलवानन यांनी आईएएनएसला सांगितले की, राम्या मॅम अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. प्रेक्षकांना त्या दोघांच्या भूमिका आवडतील, अशी आशा आहे. अशा पद्धतीने चांगल्या कलाकारांना एकत्र आणणे आणि त्यांच्यासोबत काम करणे खूप रोमांचक आहे. सध्या आम्ही या दोघांच्या महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण मुंबईत करतो आहे.
'उयन्थ्रा मनिथन'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता एस. जे. सूर्याने ट्विटरवर अमिताभ बच्चन यांचा लूक शेअर केला आणि लिहिले की, माझ्या जीवनातील खूप छान क्षण.ज्याबद्दल मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता. ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मी आई वडील आणि देवाचे आभार मानतो.