Join us  

'मी अखेरचा श्वास घेईल तेव्हा...'; संपत्ती वाटपाबाबत बिग बींनी घेतलाय हा मोठा निर्णय, पत्नीचीही साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 11:44 AM

अमिताभ यांनी त्यांच्या मृत्यूनंतर संपत्ती वाटप कसं होईल, याविषयी घेतलेला निर्णय एका मुलाखतीत सांगितला आहे

अमिताभ बच्चन हे भारतीय मनोरंजन विश्वातील महानायक म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांनी वयाची ८० वर्ष ओलांडली तरीही अजूनही विविध सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अमिताभ यांचा काहीच महिन्यांपूर्वी रिलीज झालेला 'कल्कि २८९८ एडी' सिनेमा चांगलाच गाजला. बिग बींनी साकारलेल्या अश्वत्थामाच्या भूमिकेचंही चांगलंच कौतुक झालं. नुकतीच अमिताभ यांच्याविषयी एक महत्वाची माहिती समोर येतेय. जेव्हा अमिताभ या जगात नसतील तेव्हा त्यांची संपत्ती वाटप कसं होईल, याविषयी त्यांनी एक निर्णय घेतला आहे.

अमिताभ यांनी संपत्ती वाटपाबाबत घेतला हा मोठा निर्णय

अमिताभ यांनी रेडीफला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता. अमिताभ म्हणाले होते, "जेव्हा मी जगाचा निरोप घेईन तेव्हा माझ्यामागे जी काही संपत्ती असेल ती दोन्ही मुलांमध्ये समान विभागली जाईल. मुलगी ही पराया धन असते असं म्हणतात. परंतु माझ्यासाठी माझा मुलगा अभिषेक आणि मुलगी नव्या एकसारखे आहेत. त्यामुळे माझ्या संपत्तीचं दोघांमध्ये समान वाटप होईल. जयाची सुद्धा माझ्या या म्हणण्याला साथ आहे."

अमिताभ यांनी मुलीच्या नावावर केला बंगला

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी मुलगी नव्याच्या नावावर 'जलसा' केला. त्यामुळे अमिताभ मुलगा - मुलगी यामध्ये भेदभाव करत नाहीत, हे यावरुन पाहायला मिळतं. अमिताभ सध्या 'केबीसी १६' चं सूत्रसंचालन करत आहेत. पुन्हा एकदा त्याच सळसळत्या एनर्जीमध्ये अमिताभ 'केबीसी १६' चं होस्टिंग करत आहेत. अमिताभ बच्चन रजनीकांतसोबत आगामी 'वेट्टियन' या सिनेमात झळकणार आहेत. अमिताभ-रजनीकांत या सिनेमानिमित्ताने अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येत आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनऐश्वर्या राय बच्चनजया बच्चनअभिषेक बच्चन