Join us

ऑस्ट्रेलियाला भारताने कसोटीत हरवल्याने अमिताभ आनंदी; परंतु 'या' गोष्टीवर केली टीका म्हणाले-

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 11:56 IST

अमिताभ बच्चन यांनी भारताने ऑस्ट्रेलियाला हरवल्यावर केलेली मार्मिक पोस्ट चर्चेत आहे (amitabh bachchan)

बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट सीरिजमध्ये भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. कोहलीचं दमदार शतक, यशस्वी जयस्वालची खेळी आणि जसप्रीत बुमराहने केलेला भेदक मारा या जोरावर भारताने बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात सहज मात केली. जगभरातील क्रिकेटप्रेमी यासाठी भारताचं अभिनंदन करत आहेत. तोच बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ यांनीही भारताचं अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली शिवाय एका गोष्टीवर नाराजी व्यक्त केली.

अमिताभ यांनी टीम इंडियासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचं क्रिकेटप्रेम सर्वांना माहितच आहे. अमिताभ यांनी भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात हरवल्यावर त्यांच्या ब्लॉगवर एका वाक्यात अभिनंदनाची पोस्ट शेअर केली. अमिताभ म्हणाले की, "वाईट कॉमेंट्री असूनही भारताने ऑस्ट्रेलियाला चांगलीच मात दिली." अशाप्रकारे बॉर्डर-गावस्कर सीरिजच्या पहिल्या सामन्यात जिंकलेल्या भारताचं बिग बींनी अभिनंदन केलंच शिवाय सामन्यादरम्यान केलेल्या कॉमेंट्रीवर टीका-टिप्पणी केली.

भारत-ऑस्ट्रेलियामधील कॉमेंट्रीमध्ये पक्षपात?

भारत - ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर सामन्यादरम्यान भारतीय संघातील मिडियम पेसर्स गोलंदाजांबद्दल कॉमेंटेटर्सने इतकं काही बरं वक्तव्य केलं नाही. त्यामुळे कॉमेंटेटर्स पक्षपात करत आहेत, असं अनेकांना वाटलं. बिग बींनी याच मुद्द्यावर बोट ठेवत कॉमेंटेटर्सवर निशाणा साधला आणि त्यांच्यावर अवघ्या काही शब्दात मार्मिक टीका केली. दरम्यान पहिला सामना जिंकल्यावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना ६ डिसेंबरला होणार आहे.

 

टॅग्स :अमिताभ बच्चनभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया