अमिताभ अफगाणिस्तानात जाणार हे ऐकून जाम संतापल्या होत्या तेजी बच्चन...; काबुलमध्ये बनला  ‘खुदा गवाह’!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 01:01 PM2021-08-17T13:01:07+5:302021-08-17T13:04:37+5:30

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सर्वत्र अराजक माजलं आहे. कधी काळी याच अफगाणिस्तानात अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमाचे शूटींग झाले होते.

amitabh bachchan film khuda gawah was shot in kabul terrorists used to stop firing after hearing sridevi name | अमिताभ अफगाणिस्तानात जाणार हे ऐकून जाम संतापल्या होत्या तेजी बच्चन...; काबुलमध्ये बनला  ‘खुदा गवाह’!

अमिताभ अफगाणिस्तानात जाणार हे ऐकून जाम संतापल्या होत्या तेजी बच्चन...; काबुलमध्ये बनला  ‘खुदा गवाह’!

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीदेवी त्या दिवसांत अफगाणिस्तानात जणू शांतीचे प्रतिक बनी होती. असे म्हणतात की, तालिबानीही श्रीदेवीच्या प्रेमात होते. इतके की, तिचे नाव ऐकताच ते गोळीबार बंद करत असत.

तालिबानने अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर अनेक अफगाण नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सर्वत्र अराजक माजलं असून लोक देश सोडून जीव वाचवण्याची  धडपड करत आहेत. अफगाणिस्तानातील विमानतळावरची दृश्ये चिंता वाढवणारी आहेत. कधी काळी याच अफगाणिस्तानात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan )यांच्या एका सिनेमाचे शूटींग झाले होते. या सिनेमाचे नाव आहे, ‘खुदा गवाह’. तेव्हा अफगाणिस्तानातील स्थिती आत्ता इतकी गंभीर नव्हती. पण चांगलीही नव्हती. तालीबानींकडून गोळीबाराच्या घटना सर्रास होत होत्याच.
‘खुदा गवाह’च्या (Khuda Gawah) अफगाणिस्तानात झालेल्या शूटींगचे अनुभव खुद्द अमिताभ यांनी 2013 साली एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते.  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले  आणि निर्माता मनोज देसाई यांनी देखील या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या घडामोडींना नुकताच उजाळा दिला आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी  या चित्रपटात जेलर रणवीर सिंह सेठी ही भूमिका केली होती. 

जाम संतापल्या होत्या तेजी बच्चन...
 या चित्रपटाचे निर्माते मनोज देसाई यांनी शूटिंगदरम्यानचे अनुभव एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की या चित्रपटाचे शूटिंग अफगाणिस्तानमध्ये व्हावे, अशी खुद्द अमिताभ बच्चन यांची इच्छा होती. यासाठी अमिताभ यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी  यांच्यासोबत चर्चा केली होती. कारण राजीव गांधी यांचे अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांच्याशी चांगले संबंध होते.  मात्र युध्दग्रस्त अफगाणिस्तानमध्ये आपला मुलगा शूटिंगसाठी जात आहे, ही गोष्ट जेव्हा अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन यांना समजली तेव्हा त्या खूप चिडल्या होत्या. जर माझ्या मुलाला काही झाले तर तू परत येऊ नकोस, तिथेच आत्महत्या कर, असे त्या चिडून मला म्हणाल्याचे मनोज देसाई यांनी सांगितले.  अभिनेत्री श्रीदेवी यांची आई देखील या शूटिंगच्या अनुषंगाने चिंतेत होती.

तालिबानी नेत्याने दिले गुलाबाचे फुल...
शूटींगस्थळी कडेकोट बंदोबस्त होता. पण इतका बंदोबस्त असूनही तालिबानी अमिताभ व श्रीदेवीला पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती.  शूटिंगदरम्यान अफगाणिस्तान सरकारने  सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त ठेवला होता.   पण इतके असूनही अमिताभ बच्चन यांना एका तालिबानी नेत्याने हेलिकॉप्टरमधून येऊन गुलाबाचे फूल दिले होते, अशी एक आठवणही देसाई यांनी सांगितली.  

सुरक्षेसाठी अर्धी फोर्स
काबुलच्या अर्टल ब्रिजपासून तर मजार-ए-शरीफपर्यंत अफगाणिस्तानच्या अनेक भागांत ‘खुदा गवाह’चे शूटींग झाले होते. अमिताभ व श्रीदेवी मजार-ए-शरीफ येथे शूटींग करत होते. अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह अहमदजई यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी अगदी देशाची अर्धी फौज रस्त्यावर तैनात केली होती. 

श्रीदेवीचे नाव ऐकताच गोळीबार बंद व्हायचा...
श्रीदेवी त्या दिवसांत अफगाणिस्तानात जणू शांतीचे प्रतिक बनी होती. असे म्हणतात की, तालिबानीही श्रीदेवीच्या प्रेमात होते. इतके की, तिचे नाव ऐकताच ते गोळीबार बंद करत असत.

Web Title: amitabh bachchan film khuda gawah was shot in kabul terrorists used to stop firing after hearing sridevi name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.