Join us

जाणून घ्या कसा आहे अमिताभ बच्चन यांचा डाएट प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 5:33 PM

अमिताभ आजही त्यांच्या कामात इतके व्यग्र असतात की, ते या वयातही रोज रात्री तीन पर्यंत काम करतात. त्यांना बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेता मानले जाते. या वयातही त्यांचा फिटनेस जबरदस्त आहे.

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशहा म्हटले जाते. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांना बॉलिवूडचा सुपरस्टार मानले जाते. त्याचसोबत त्यांनी छोट्या पडद्यावर देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या अनेक सिझनचे त्यांनी सूत्रसंचालन केले असून हे सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावते. अमिताभ बच्चन हे ७५ वर्षांचे झाले असले तरी आजही ते तितक्याच जोमाने काम करतात. ते आजही अनेक चित्रपटांमध्ये काम करतात. तसेच अनेक जाहिरातींचा भाग असतात. आज बॉलिवूडमधील सगळ्यात बिझी कलाकारांमध्ये त्यांची गणना केली जाते.  अमिताभ आजही त्यांच्या कामात इतके व्यग्र असतात की, ते या वयातही रोज रात्री तीन पर्यंत काम करतात. त्यांना बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेता मानले जाते. या वयातही त्यांचा फिटनेस जबरदस्त आहे. गेल्या कित्येक वर्षांपूर्वीच त्यांचे लिव्हर ७५ टक्के निकामी झाले आहे. त्यांनीच ही गोष्ट मीडियाला सांगितली होती. त्यांनी सांगितले होते की, २००० मध्ये मी रेग्युलकर चेकअप साठी गेलो असता मला कळले की, माझे लिव्हर हे ७५ टक्के निकामी झालेले आहे.  अमिताभ यांचे लिव्हर २५ टक्केच कार्यरत असले तरी त्यांनी डाएट आणि व्यायामाने आपली तब्येत खूपच चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. बिग बी म्हणजेच अमिताभ यांना कोणत्याच प्रकारचे व्यसन नाहीये. ते स्मोक करत नाहीत किंवा दारू पित नाहीत. तसेच ते चहा आणि कॉफीचे देखील सेवन करत नाहीत. तसेच ते गोड पदार्थ खाणे टाळतात. अमिताभ हे शुद्ध शाकाहारी आहेत. योग्य खाण्यासोबत तुम्ही योग्य व्यायाम देखील केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. ते त्यांच्या कामात कितीही व्यग्र असले तरी ते दिवसातील काही तास व्यायाम आणि योगा आवर्जून करतात.अमिताभ या वयात देखील अनेक तास चित्रीकरण करतात. तसेच कोणतेही तापमान असो ते चित्रीकरण करायला कधी नकार देत नाहीत.  

टॅग्स :अमिताभ बच्चन