उकाड्याने महानायक अमिताभ बच्चनही हैराण! अशी झाली अवस्था!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 03:00 PM2019-06-02T15:00:00+5:302019-06-02T15:00:02+5:30

वाढत्या गर्मीने सगळेच त्रस्त आहेत. महानायक अमिताभ बच्चन हेही गर्मीमुळे हैराण आहेत. गर्मीमुळे अमिताभ बच्चन इतके त्रासले आहेत की, त्यांना वाचायलाही त्रास होतोय.

amitabh bachchan funny tweet on raising temperature and its effect on him | उकाड्याने महानायक अमिताभ बच्चनही हैराण! अशी झाली अवस्था!!

उकाड्याने महानायक अमिताभ बच्चनही हैराण! अशी झाली अवस्था!!

googlenewsNext
ठळक मुद्देअमिताभ यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या ते ‘चेहरे’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहेत.

वाढत्या गर्मीने सगळेच त्रस्त आहेत. महानायक अमिताभ बच्चन हेही गर्मीमुळे हैराण आहेत. गर्मीमुळे अमिताभ बच्चन इतके त्रासले आहेत की, त्यांना वाचायलाही त्रास होतोय. होय, बिग बींचे ताजे ट्विट पाहिल्यानंतर तुम्हालाही याची खात्री पटेल. अतिशय मजेशीर अंदाजात बिग बी यांनी वाढत्या गर्मीबद्दल लिहिले आहे. ‘गर्मी की वजह से हालात ऐसे हो गये हैं कि आजकल तजुरबा लिखा हुआ भी तरबूजा पढने में आता है,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे. यासोबत टरबुजाची इमोजी आणि एक कलरफुल फोटोही पोस्ट केला आहे.




सध्या बिग बी बरेच आरामात आहेत. कारण आज सकाळपासून दुपारपर्यंत एकापाठोपाठ एक असे १२ ट्वीट त्यांनी केले आहे. यातील काही ट्वीटमध्ये त्यांनी काही ज्ञानात भर घालणा-या गोष्टी लिहिल्या आहेत तर काही ठिकाणी विनोदही केले आहेत.







अमिताभ यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या ते ‘चेहरे’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहेत.    या चित्रपटात अमिताभ इमरान हाश्मीसोबत दिसणार आहेत. ‘चेहरे’ हा सिनेमा २१ फेब्रुवारी, २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात क्रिती खरबंदा, रिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, अन्नू कपूर व रघुवीर यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व इमरान हाश्मी रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणे कमालीचे ठरणार आहे. रूमी जाफरी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.  याशिवाय अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही अमिताभ एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Web Title: amitabh bachchan funny tweet on raising temperature and its effect on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.