बॉलिवूडचे 'शहेनशाह' मेगास्टार अमिताभ बच्चन जितके सिनेमांमध्ये सक्रिय असतात तेवढेच सोशल मीडियावरही सक्रिय असतात. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना प्रचंड फॅन फॉलोइंग आहे आणि त्यांची प्रत्येक पोस्ट चांगलीच व्हायरल होत असते. अमिताभ बच्चन यांना आपला असाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामुळे त्याना ट्रोल केलं जातंय.
बिग बीने रात्री स्वत: चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत अमिताभ बच्चन पलंगावर झोपलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावरील चाहत्यांनी त्याच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु केला आहे. एक यूजरने बिग बींचा हा फोटो पाहून कमेंट केली आहे की, झोपलेल्या माणसाला उठवता येते पण झोपेचे सोंग घेऊन असेल त्याला उठवता येत नाही. बिग बींच्या या फोटोवरुन जोरदार मीम्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.
देशभरात कोरोना कालावधीनंतर अनेक गोष्टी घडल्या. मध्यंतरी शेतकरी आंदोलनावरुन देशाला बदनाम करण्याचा प्रकार होत असल्याच्या विरोधात अनेक सेलिब्रिटी एकटवले होते. या सेलिब्रिटींनी सरकारच्याबाजूने उभे राहत ट्विट केले. मात्र, त्यावेळीही अमिताभ यांची संयमी भूमिका घेतली. दरम्यान, वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरुनही त्यांना ट्रोल करण्यात आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला होता. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार आणि अमिताभ यांना पेट्रोल दरवाढीवरून सुद्धा ट्रोल केलं गेलं होतं. काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता. आता, राजदनेही ट्विट करुन महानायकासह इतरांनाही आता गप्प का, पांघरुन घेऊन झोपलात का? असा सवाल विचारला गेला होता.