महानायक अमिताभ बच्चन स्टारर ‘हम’ या सुपरहिट चित्रपटातील ‘जुम्मा चुम्मा’ हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र खूपच कमी लोकांना माहिती आहे की, हे गाणे रिलीज होण्याअगोदर बिग बीने यावर श्रीदेवीसोबत फरफॉर्मन्स केला होता. होय, ७५ वर्षीय अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लंडमध्ये १९९० मध्ये झालेल्या एका कॉन्सर्टमधील एक जुना फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये ते अभिनेत्री श्रीदेवीसोबत दिसत आहेत. या कॉन्सर्टमध्ये त्यांनी श्रीदेवीसोबत ‘जुम्मा चुम्मा’ या गाण्यावर ताल धरला होता. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, १९९० मध्ये लंडनच्या वेम्बली स्टेडियममध्ये... श्रीदेवी, आमीर आणि सलमानची पहिली कॉन्सर्ट... तेव्हा सलमानचा ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट रिलीज झाला होता... तर आमीरचे काही चित्रपट रिलीज झाले होते. कार्यक्रमाचे नाव होते ‘द जुम्मा चुम्मा शो’!youtube video: qeXdggoVF-Yमहानायक अमिताभने पुढे लिहिले की, ‘गाणे आणि चित्रपट रिलीज होण्याअगोदर श्रीदेवीसोबत परफॉर्मन्स केला होता. खूपच अद्भुत असा क्षण.’ दरम्यान ‘हम’ या चित्रपटाचे मुकुल एस. आनंद यांनी दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट १९९१ मध्ये रिलीज झाला होता. महानायक यांनी ही आठवण इन्स्टावर शेअर करून पुन्हा एकदा या सुपरहिट गाण्याच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. वास्तविक अमिताभ ट्विटर आणि फेसबुकच्या तुलनेत इन्स्टाग्रामवर अधिक अॅक्टिव्ह असतात. गेल्या रविवारी त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत अनेक जुने फोटो शेअर करून त्यांच्या काळातील आठवणी ताज्या केल्या.
यावेळी त्यांनी अभिषेक बच्चनसोबतचा एक सेटवरील न बघितलेला फोटोही शेअर केला. इन्स्टाग्रामवर बिग बीचे ६.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. सध्या महानायक यशराज प्रॉडक्शनच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते की, ते चित्रपटाच्या दुसºया भागाच्या शूटिंगसाठी लवकरच थायलॅण्डला पोहोचले आहेत. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटात महानायकांबरोबर आमीर खान हादेखील प्रमुख भूमिकेत बघावयास मिळणार आहे. आमीर आणि अमिताभ यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या दोघांव्यतिरिक्त कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.