Join us

अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली 'ही' खंत, ऐकल्यावर तुम्हालाही वाटेल चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 20:12 IST

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. लवकरच ते तमीळ चित्रपट 'उर्यन्ता मणिथन'मध्ये दिसणार आहेत.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. लवकरच ते तमीळ चित्रपट 'उर्यन्ता मणिथन'मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील फोटो शेअर करून अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक खंतदेखील व्यक्त केली आहे. 

'उर्यन्ता मणिथन' या तमीळ चित्रपटातून अमिताभ बच्चन दाक्षिणात्य इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून यामध्ये अमिताभ बच्चन साऊथ इंडियन स्टाईलमध्ये दिसत आहेत. हा फोटो अभिनेता एस. जे. सूर्या यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो अमिताभ बच्चन यांनी शेअर करत वाढत्या वयाचा एक दुष्परिणाम असल्याची खंत व्यक्त केली व पुढे लिहिले की, तुम्ही मोठे होत जाता आणि तुम्हाला आपुलकीने 'तू' अशी हाक मारणारे फार कमी व्यक्ती उरतात.

 

अमिताभ यांच्या कामाबद्दल सांगायचे तर ते 'झुंड' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. 'झुंड' या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे करत आहेत. हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व नागराज मंजुळे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चननागराज मंजुळे