Join us

अमिताभ बच्चन यांनी SBI ला भाड्याने दिली त्यांची प्रॉपर्टी, महिन्याला मिळणारं भाडं वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 4:41 PM

बच्चन परिवाराने आपला जुहूमधील बंगला अम्मू आणि वत्सचा ग्राउंड फ्लोर स्टेट बॅंक ऑफ इंडियाला रेंटवर दिला आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांची जुहूमधील प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे. ज्यासाठी त्यांना दर महिन्याला मोठी रक्कम भाड्याच्या रूपात मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बच्चन परिवाराने आपला जुहूमधील बंगला अम्मू आणि वत्सचा ग्राउंड फ्लोर स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (State Bank Of India) रेंटवर दिला आहे. १५ वर्षांसाठी लीजवर दिलेल्या या घरातून अमिताभ आणि अभिषेक यांना मोठी रक्कम मिळणार आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, रिअल इस्टेट एनालिटिक्स आणि रिसर्च कंपनी Zapkey.com ला बच्चन परिवार आणि स्टेट बॅंकेत झालेल्या या १५ वर्षाच्या डीलची कागदपत्रे मिळाली आहेत. ज्यात सांगण्यात आलं आहे की, ही प्रॉपर्टी भाड्याने दिल्यावर बच्चन परिवाराला बॅंकेकडून दर महिन्याला १८.९ लाख रूपये भाडं मिळणार आहे.

रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, ५ वर्षानंतर या प्रॉपर्टीच्या रेंटमध्ये वाढ होईल. ज्यानुसार पुढील पाच वर्षात त्यांना हे रेंट वाढून दर महिन्याला २३.६ लाख रूपये मिळतील. आणि नतंर १० वर्षानंतर पुढील पाच वर्षापर्यंत बच्चन परिवाराला २९.५ लाख रूपये महिना रेंट मिळेल.

मीडिया रिपोर्टनुसार, बच्चन परिवाराने बॅंकेसोबत ही डील २८ सप्टेंबर २०२१ ला साइन केली. अमिताभ यांचे हे दोन्ही बंगले 'जलसा'च्या समोरच आहेत. त्यांचा परिवार जलसामध्येच राहतो. या डॉक्युमेंटनुसार, प्रॉपर्टीचा जो भाग रेंटने दिला गेला आहे तो साधारण ३,१५० स्क्वेअर फूट भागात आहे.

या डॉक्युमेंट्नुसार, पुढील १२ महिन्याच्या रेंटची रक्कम बच्चन परिवाराला आधीच देण्यात आली आहे. ती २.२६ कोटी इतकी आहे. मात्र, या डीलबाबत SBI किंवा बच्चन परिवाराकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. असं सांगितलं जात आहे की, याआधी ही जागा Citibank ला दिली गेली होती. 

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडमुंबईएसबीआय