Join us

Amitabh Bachchan Health: शूटिंग करताना जखमी झालेल्या अमिताभ बच्चन यांनी स्वत:च दिली प्रकृतीबाबतची अपडेट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 12:50 PM

मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन हे हैदराबाद येथे चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुर्घटनेत जखमी झाले होते. बिग बींनी त्यांच्या प्रकृतीबाबतची अपडेट स्वत:च दिलीय.

Amitabh Bachchan Health Update: मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन हे हैदराबाद येथे चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ च्या साहसी दृश्यांचे हैदराबादच्या सेटवर चित्रीकरण करत असताना अपघात होऊन बरगड्या तुटल्या आहेत.  अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी त्यांच्या ब्लॉगवर नुकत्याच झालेल्या दुखापतीबद्दल हेल्थ अपडेट शेअर केली. याआधीही बिगने ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या दुखापतीबद्दल सांगितले होते.

आपल्या ब्लॉगमध्ये ते म्हणाले, “सर्वप्रथम.. माझ्या दुखापतीबद्दल काळजी व्यक्त करणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तुमच्या  प्रार्थनांबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतो.  हळुहळू...याला वेळ लागेल.. आणि डॉक्टरांनी जे सांगितले आहे ते काटेकोरपणे पाळले जात आहे. विश्रांती घ्या आणि छातीवर मलमपट्टी करा..सर्व काम थांबले आहे आणि प्रकृती सुधारल्यानंतर सुरू होईल..पण मी सर्वांचे खूप आभारी आहे.

जलसामध्ये झाली होलिका दहन बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये जलसामधील होलिका दहनाबद्दल सांगितले. त्यांनी लिहिले, "काल रात्री जलसामध्ये 'होलिका' पेटवली होती, होळीच्या दिवशी तारखेबाबत संभ्रम होता.. . आज होळी साजरी होत आहे. मी विश्रांती घेतोय. पण या आनंदाच्या उत्सवासाठी माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.. रंगांचा वसंत ऋतू होळी तुमच्या जीवनात जीवनाचे विविधांगी रंग घेऊन येवो.. आणि नंतरही.. पण नेहमीप्रमाणेच आताही आभार व्यक्त करतोय''.

'प्रोजेक्ट के'च्या सेटवर दुखापत झालीबच्चन यांनी त्यांच्या वैयक्तिक ब्लॉगवर एका पोस्टमध्ये होती, त्यांच्या बरगडीचे हाड फ्रॅक्चर झाले तसेच उजव्या बरगडीतील स्नायू फाटले आहेत. पट्टा बांधण्यात आला आहे. हैदराबादस्थित एआयजी रुग्णालयात त्यांचे सीटी स्कॅन करून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चित्रीकरण रद्द करावे लागले. ‘वेदना होत आहेत, त्यासाठी औषधी दिली आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनसेलिब्रिटी