Join us

अमिताभ बच्चन यांनी मराठीत केला डेब्यू, पोस्टरमध्ये त्यांच्यासोबत विक्रम गोखले दिसले हटक्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 18:27 IST

एबी आणि सीडी असे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात त्यांच्यासोबतच विक्रम गोखले यांची मुख्य भूमिका आहे.

ठळक मुद्देया चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून यात विचारमग्न अमिताभ बच्चन दिसत असून विक्रम गोखले यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते बॉलिवूडवर राज्य करत असून त्यांचा आगामी चित्रपट कधी येणार याची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. सध्या त्यांचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळत असून त्याला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमिताभ बच्चन यांची काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपटात एक झलक पाहायला मिळाली होती. केवळ एका गाण्यासाठी ते या चित्रपटात दिसले होते. पण आता ते एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

एबी आणि सीडी असे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात त्यांच्यासोबतच विक्रम गोखले यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून यात विचारमग्न अमिताभ बच्चन दिसत असून विक्रम गोखले यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलमध्ये उभे असलेले विक्रम गोखले सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांनी या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या याराना या चित्रपटातील सारा जमाना या गाण्यातील त्यांच्या गेटअपप्रमाणे गेटअप केलेले आहे.

एबी आणि सीडी या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद लेले यांचे असून या चित्रपटात दोन मित्रांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अमिताभ आणि विक्रम गोखले हे दोघे दोन मित्रांच्या भूमिकेत दिसणार असून विक्रम गोखले चंद्रकांत देशपांडे ही भूमिका साकारणार आहेत. एबी आणि सीडी या चित्रपटात या दोघांसोबतच सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंसाळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनविक्रम गोखले