Join us

कोटयावधींचे मालक असलेली बिग बी एकेकाळी झाले होते कर्जबाजारी; अभिषेकला अर्ध्यावर सोडावं लागलं शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 1:59 PM

Amitabh bachchan: एका मुलाखतीत अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या वडिलांवर म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केलं होतं. त्यावेळी अभिषेक बोस्टनमध्ये शिकत होता.

बॉलिवूडचे शेहनशहा, बिग बी, बच्चन साहब अशा कितीतरी नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan). गेल्या कित्येक वर्षांमध्ये प्रसिद्धीसोबतच त्यांनी संपत्तीदेखील कमावली आहे. त्यामुळे कलाविश्वातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत त्यांचं नाव कायम अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, आजच्या घडीला इतकं सुख, वैभव उपभोगणाऱ्या बिग बींवर एकेकाळी कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. 

एका मुलाखतीत अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या वडिलांवर म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केलं होतं. त्यावेळी अभिषेक बोस्टनमध्ये शिकत होता. विशेष म्हणजे वडिलांवर कोसळलेलं संकट पाहून अभिषेकने शिक्षण अर्धवट सोडून पुन्हा देश गाठला होता.

अभिषेक बोस्ट विद्यापीठात अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी गेला होता. याच काळात २००० मध्ये शिक्षण सुरु असताना त्याचा 'रेफ्युजी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एकीकडे शिक्षण, हातात चित्रपट असं सारं काही अभिषेकचं सुरळीत सुरु होतं. परंतु, त्याच काळात बिग बी आर्थिक संकटाचा सामना करत होते. अनेक जण त्यांचा प्रतीक्षा बंगला खरेदी करण्यासाठीही दारात रांगा लावून उभे होते. या घटनेची माहिती अभिषेकला मिळाली. त्यानंतर त्याने शिक्षण अर्धावर सोडून तो घरी परतला.

दरम्यान, वडिलांच्या संकट काळात त्यांची मदत करणं हे कर्तव्य असल्याचं म्हणत अभिषेकने शिक्षण अर्ध्यावर सोडलं. परंतु, कालांतराने बिग बींवरचं आर्थिक संकट कमी झालं. विशेष म्हणजे या आर्थिक संकटाविषयी अमिता बच्चन यांनीदेखील एका मुलाखतीमध्ये स्वत: खुलासा केला होता.  

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी