महानायक अमिताभ बच्चन या वयातही प्रचंड बिझी आहे. एकापाठोपाठ एक सिनेमे, शूटींग, प्रवास असा सगळा व्याप असूनही अमिताभ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसतात. स्वत:चे जुने फोटो, कविता, विनोद असे सगळे ते सोशल मीडियावर शेअर करतात. आता अमिताभ यांनी एक कविता शेअर केली आहे. या कवितेचा विषय आहे, कोरोना व्हायरस. होय, अख्ख्या जगाला धडकी भरवणा-या कोरोना व्हायरसवर अमिताभ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाला घाबरू नका तर खंबीरपणे सामना करा, असे त्यांनी लिहिले आहे. सोबत एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत अमिताभ त्यांनी लिहिलेली कविता म्हणताना दिसत आहेत.
त्यांची कविता शब्दांत...
‘बहुत इलाज बताते हैं जन-जनमानस सब. किसकी सुनें किसकी नहीं कौन बताए अब. कोई कहता है कलौंजी पीसो कोई कहता है आंवला रस. कोई कहता है घर में बैठो हिलो न टस से मस. ईर कहते हैं और बीर कहते हैं ऐसा कुछ भी करो न. बिना साबुन हाथ न धोएं और किसी को छुएं न. हमने कहा कि चलो हम ही कर देते हैं जैसा बोल रहे हैं सब. आने दो कोरोना-वोरोना ठेंगा दिखाओ तब.’
कोरोना व्हायरसने बॉलिवूडमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक इव्हेंट रद्द करण्यात आले असून काही चित्रपटांच्या रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा येत्या 24 मार्चला रिलीज होणार होता. पण कोरोनाच्या धोक्यामुळे ही रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे.