तू कोरोनाने मेलास तर बरा... असे म्हणणा-या एका हेटर्सला अलीकडे अमिताभ बच्चन यांनी सडेतोड उत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा अशाच एक हेटर्सला त्यांनी फैलावर घेतले. सत्य माहित नसेल तर स्वत:च्या स्वच्छ तोंडाला स्वच्छच ठेवावं, अशा शब्दांत अमिताभ यांनी या ट्रोलरची बोलती बंद केली.तर झाले असे की, महानायक अमिताभ नुकतचे कोरोनावर मात करून रूग्णालयातून घरी पतरले. 23 दिवसांनंतर अमिताभ कोरोनावर विजय मिळवून घरी परतताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
‘अमूल’ने अमिताभ यांच्यासाठी खास कार्टून प्रसिद्ध केले. बिग बींनी सुद्धा हे कार्टून आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर करत अमूलचे आभार मानलेत. ‘वर्षों से अमूलने सन्मानित किया है मुझे. एक साधारण शक्सियत को अमूल बना दिया मुझे,’ असे या कार्टूनवर प्रतिक्रिया देताना अमिताभ यांनी लिहिले. यानंतर त्यांच्या या पोस्टवर लोकांनी प्रतिक्रिया देणे सुरु केले. मात्र याचदरम्यान एक युजर नको ते बरळला. मग काय, या बरळणाºया युजरने अमिताभ यांनी चांगलेच सुनावले.
अन् अमिताभ संतापले...
‘मुफ्त में तो अमूल्य नहीं बने होंगे... तय रकम ली होगी... हर साल बढी होगी,’ अशा शब्दांत या युजरने अमिताभ यांना ट्रोल केले. त्याची ही कमेंट पाहून अमिताभ यांचा पारा चढला. यानंतर त्यांनी या ट्रोलरचा खरपूस समाचार घेतला. ‘बहुत बडी गलतफहमी में चल है है आप मियां... जब सच ना मालून हो तो अपने स्वच्छ मुख को स्वच्छ रखिए’, असे उत्तर त्यांनी दिले. ‘मी या कार्टूनसाठी कधीच अमूलला विनंती केली नाही. बाण सोडण्याआधी थोडा तर नीट विचार करावा. नाहीतर तो बाण तुमच्यावर येऊन पडेल. जसे की आत्ता झालेय. मी बाण म्हटलेय. पण बाणाच्या जागी एक वेगळी म्हण आहे, जो अन्य पदार्थाचे वर्णन करतो. माझे सभ्य संस्कार मला त्याचे वर्णन करण्यापासून मला रोखून धरलेय,’ असेही अमिताभ यांनी या ट्रोलरला सुनावले.