अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; पण फोटो शेअर करत म्हणाले, सॉरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 12:02 PM2021-05-16T12:02:07+5:302021-05-16T12:04:50+5:30

Amitabh Bachchan : लस घेतल्यानंतर काय म्हणाले बिग बी? का मागावी लागली माफी?

amitabh bachchan says sorry after gets his second dose of covid 19 vaccine | अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; पण फोटो शेअर करत म्हणाले, सॉरी

अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; पण फोटो शेअर करत म्हणाले, सॉरी

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या 1 एप्रिलला अमिताभ यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती शेअर केली होती.

कोरोनाने सगळीकडे दहशत असताना आधार तो फक्त लसीचा. सध्या देशभर लसीकरण सुरु आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही कोरोना लस (Covid-19 vaccine)  घेतली आहे. आता महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नंबर लावलाये. काल त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. सोशल मीडियावर त्यांनी स्वत: ही माहिती दिली. पण हा दुसरा डोस घेताना अमिताभ यांनी चक्क चाहत्यांची माफी मागितली. आता का? तर त्यासाठी तुम्हाला त्यांची पोस्ट वाचावी लागेल.

इन्स्टाग्रामवर बिग बींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्याच सांगितले. लस घेतानाचा फोटोही त्यांनी शेअर केला. यावेळी फोटोसोबत त्यांनी दिलेले कॅन्शन लक्षवेधी ठरले.

‘दुसरा सुद्धा झाला.. कोव्हिड वाला.. क्रिकेटवाला नाही़...! सॉरी, सॉरी, हे खूपच वाईट होतं...’, असे मजेशीर कॅप्शन देत त्यांनी सोबतच काही हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
त्यांची ही पोस्ट वाचल्यानंतर अनेकांना हसू आवरले नाही. अनेकांनी यावर कमेंट्स केल्यात. चला, दोन्ही डोज झालेत म्हणजे तुम्ही ‘केबीसी 13’ साठी सज्ज झालात, असे एका युजरने यावर कमेंट करताना लिहिले. तर अनेकांनी आम्हाला व्हॅक्सिन द्या, असे म्हणत अद्याप लस न मिळाल्याचे दु:ख त्यांच्यासोबत शेअर केले.

गेल्या 1 एप्रिलला अमिताभ यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती शेअर केली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अमिताभ यांना कोरोना झाला होता. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

Web Title: amitabh bachchan says sorry after gets his second dose of covid 19 vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.