बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे कोट्यवधी चाहते आहेत. बॉलिवूडचे नवे कलाकार त्यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्यासोबत काम करायला मिळणे, हा आपला सन्मान समजतात. याऊलट अमिताभ बच्चन स्वत:ला अभिनेता मानून घ्यायलाही कचरतात. परफॉर्मन्स आणि टॅलेंटच्या बाततीत नव्या पिढीपेक्षा आपण कितीतरी मागे आहोत, हे ते विनम्रपणे मान्य करतात. केवळ इतकेच नाही तर आजघडीच्या अनेक कलाकारांपासून ते दचकून असतात. तुम्हाला खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे. आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा अशा अभिनेत्रींची मला भीती वाटते, हे स्वत: महानायक अमिताभ बच्चन यांचेच शब्द आहेत.
अलीकडे एका इव्हेंटमध्ये ते हे बोलेल. आजची नवीन पिढी कमालीची प्रतिभावान आहे. इतकी प्रतिभा की, मी त्यांच्यापुढे स्वत:ला अनेकदा खुजा समजतो. आलिया, दीपिका, अनुष्का यांच्यासोबत काम करताना मी मनातून घाबरलेला असतो. आमच्या पिढीच्या कलाकारांना स्वत:तील अभिनय प्रतिभा सिद्ध करण्यासाठी अनेक वर्षे लागलीत. त्यांनी त्यासाठी बरीच मेहनत घेतली. पण आजच्या नवीन पिढीच्या कलाकारांना काहीच सांगावे लागत नाही. आपल्याला काय हवे, हे त्यांना आधीच ठाऊक असते,असे अमिताभ म्हणाले.बिग बींनी दीपिकासोबत पीकूमध्ये काम केले आहे. लवकरच ते आलियासोबत ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहेत.