Join us

Amitabh Bachchan: प्रोजेक्ट K च्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी, बरगड्यांना झाली दुखापत, प्रकृतीबाबत येतेय अशी अपडेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 11:01 AM

Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांना चित्रिकरणादरम्यान, गंभीर दुखापत झाली आहे. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के चित्रपटाचं चित्रिकरण सुरू असताना अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली आहे.

बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांना चित्रिकरणादरम्यान, गंभीर दुखापत झाली आहे. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के चित्रपटाचं चित्रिकरण सुरू असताना अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली आहे. एका अॅक्शन सिनचं चित्रिकरण सुरू असताना त्यांना ही दुखापत झाली असून, त्यानंतर हे चित्रिकरण रद्द करावं लागलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून, त्यांना श्वास घेण्यास काहीसा त्रास होत असल्याची माहिची समोर येत आहे. दरम्यान. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अमिताभ बच्चन हे जखमी झाल्याचे वृत्त आल्यापासून त्यांच्या चाहत्यावर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे. 

अमिताभ बच्चन यांनी या अपघाताबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के च्या चित्रिकरणादरम्यान, मला ही दुखापत झाली आहे. हा अपघात एका अॅक्शन शॉटचं चित्रिकरण करताना झाला. त्यामुळे बरगड्यंना दुखापत झाली आहे. दरम्यान, दुखापतीनंतर चित्रिकरण थांबवण्यात आलं आहे. 

हैदराबादमधील एआयजी रुग्णालयामध्ये अमिताभ बच्चन यांचं सिटी स्कॅन करण्यात आलं आहे. चेकअपनंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांना मलमपट्टी करून आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

अमिताभ बच्चन यांना या दुखापतीमुळे खूप वेदना सहन कराव्या लागत आहेत. तसेच हालचाल करताना आणि श्वास घेताना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. या दुखापतीतून सावरून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अमिताभ बच्चन यांना काही काळ लागणार आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम पडावा म्हणून काही औषधे तसेच पेनकिलर्स दिले आहेत.   

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूड