बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती 11’मुळे चर्चेत आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’चे 11 वे सीझन सुरु झाले. महाराष्ट्राच्या ज्येष्ठ समजासेविका सिंधुताई सपकाळ यांनी या सीझनच्या पहिल्या ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’मध्ये सहभाग नोंदवला. सिंधुताईंनी ऐकलेल्या संघर्षाची कहाणी ऐकून अमिताभ भावूक झाले आणि याच क्रमात त्यांनी एक मोठा खुलासा केला. तो खुलासा होता अमिताभ यांच्या संपत्तीबद्दलचा. होय, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचे वाटप कसे होणार, हे त्यांनी सांगितले.
अभिषेक बच्चनला एकट्याला मिळणार नाही पित्याची संपत्ती, अमिताभ बच्चन यांनी केला संपत्ती वाटपाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 12:00 PM
अमिताभ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचे वाटप कसे होणार, हे अमिताभ यांनी सांगितले.
ठळक मुद्देकेबीसीच्या ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’मध्ये सिंधुताईंनी 25 लाख रूपये जिंकले.