Join us

'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 3:11 PM

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र मास्कला हिंदीत काय म्हणतात असं जर कोणी विचारलं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे का?... जास्त विचार करायची  गरज नाही कारण आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं आहे. 

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. प्रेरणादायी गोष्टींसह अनेक किस्से ते नेहमी शेअर करत असतात. यावेळीही त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये बिग बींनी मास्कला हिंदीमध्ये काय म्हणतात हे शोधून काढलं आहे. यासोबत त्यांनी स्वत:चा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. ज्यात त्यांनी स्पेशल मास्क लावला आहे. अमिताभ यांच्या मास्कवर त्यांच्या 'गुलाबो सिताबो' चित्रपटाची प्रिंट पाहायला मिळत आहे. बिग बींनी मास्कसाठी शोधलेला हिंदी शब्द म्हणायलाही खूप कठीण आहे.

"सापडला! सापडला! सापडला! खूप मेहनतीनंतर MASK साठीचा हिंदी शब्द सापडला. 'नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका'" असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. खूप कठीण आणि बोलायला अवघड शब्द सापडल्यावर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांचा गुलाबो सिताबो हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किमती अनलॉक केल्या"

"विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं"; 'तो' फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

धक्कादायक! तब्बल 62 एन्काउंटर करणाऱ्या माजी DSP ची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

CoronaVirus News : देशात कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने पुन्हा रेकॉर्ड मोडला

CoronaVirus News : कौतुकास्पद! मजुरांच्या मुलांना घेता यावे ऑनलाईन शिक्षण म्हणून 'त्यांनी' दान केले फोन

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाग्रस्त नर्सनी दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनी केलं भरभरून कौतुक

 

टॅग्स :अमिताभ बच्चनकोरोना वायरस बातम्याबॉलिवूड