...डावा डोळा फडफडणं असतं अशुभ, बिग बीं अमिताभ बच्चनचं हे ट्विट वाचून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 11:17 AM2020-01-14T11:17:53+5:302020-01-14T11:18:30+5:30

अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावरील पोस्ट पाहून चाहते पडले चिंतेत

Amitabh Bachchan shared post on health and mother memories | ...डावा डोळा फडफडणं असतं अशुभ, बिग बीं अमिताभ बच्चनचं हे ट्विट वाचून चाहते झाले हैराण

...डावा डोळा फडफडणं असतं अशुभ, बिग बीं अमिताभ बच्चनचं हे ट्विट वाचून चाहते झाले हैराण

googlenewsNext

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चनची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. तब्येत बरी झाली की ते लगेच कामावर रुजू होतात. नुकतेच अमिताभ बच्चन यांच्या डोळ्याशी निगडीत बाब वाचून चाहत्यांना त्यांची काळजी वाटू लागली आहे.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर त्यांच्या डोळ्यांचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी सांगितलं की, डावा डोळा फडफडू लागला आहे. हे अशुभ असतं असं बालपणी ऐकलं होतं. डोळ्यात काळा डाग तयार झाला आहे. डॉक्टरांना तो दाखवल्यानंतर हे वयामुळे असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की, लहानपणी जसं आई पदर थोडा गुंडाळून, त्यावर फूंकर मारून गरम करून डोळ्यावर लावायची तसे करा सर्व ठीक होईल.

डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायानंतर आईची आठवण झाल्यामुळे अमिताभ बच्चन खूप भावूक झाले. ते म्हणाले की, आता आई तर नाही, लाइटच्या मदतीने रूमाल गरम करून डोळ्याला लावला. पण त्याने काही वाटलं नाही. आईचा पदर तो आईचा पदर असतो त्याला दुसऱ्या कशाची सर नाही.


अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवरसुद्धा अनेकांनी आईबद्दलच्या इमोशनल रिएक्शन दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, खरंच आई असती तर हा काळा डाग डोळ्यात नाही तर कपाळावर टिळा दिसला असता.




बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर व आलिया भटसोबत 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहेत. यासोबत ते आयुषमान खुराणासोबत 'गुलाबो सिताबो'मध्ये झळकणार आहेत. याव्यतिरिक्त ते चेहरे व झुंड या चित्रपटातही काम करताना दिसणार आहे.

Web Title: Amitabh Bachchan shared post on health and mother memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.