बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह आहेत, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. सध्या त्यांच्या एका पोस्टची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी अश काही कमेंट्स केल्या आहेत की, वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. होय, अमिताभ यांनी स्वत:चाच एक अतरंगी लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या लुकची त्यांनी स्वत:च स्वत:ची खिल्ली उडवली आहे.‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरचे दोन फोटो अमिताभ यांनी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिग बींनी पांढऱ्या रंगाची हुडी त्यावर निळा स्कार्फ आणि रंगीबेरंगी हेरम पॅन्ट परिधान केला आहे. बिग बींनी स्वत:च लूकवर हटके विनोदी कविता केलीय.
‘पहन्ने, को दिया पजामा, लगा साड़ी को फाड़ा ;आगे छोटी जेब दे दी, और पीछे लगा है नाड़ा !!,’ असं त्यांनी या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.बिग बींचा हा अतरंगी लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. अनेकांना बिग बींचा हा लुक पाूहन रणवीर सिंगची आठवण झाली. ‘सर, रणवीर सिंगशी मैत्री केली का?’, असा मजेशीर प्रश्न एका चाहत्याने विचारला.
‘लगता है रणवीर सिंग घुस गया है आपके अंदर,’ अशी कमेंट करत एका युजरने अमिताभ यांच्या लुकची खिल्ली उडवली. काही युजर्सनी तर चक्क रणवीरला सतर्क राहण्याचा सल्ला दिला. ‘रणवीर भावा जरा सांभाळून रहा फॅशनमध्ये आता बीग बी देखील टक्कर देत आहेत,’ अशा आशयाच्या कमेंट्स काही युजर्सनी केल्या. आता रणवीर काय घालणार? असा मजेशीर सवाल एका युजरने केला.अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बिग बी लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात झळकणार आहेत. रणबीर कपूर, आलिया भट मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा येत्या 9 सप्टेबरला रिलीज होणार आहे. याशिवाय गुडबाय, उंचाई या सिनेमातही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.