Join us

 बसमधील ‘त्या’ मुलीवर जडला होता अमिताभ बच्चन यांचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 10:36 AM

होय, दिल्लीच्या कॉलेजात शिकत असतानाचा एक मजेशीर किस्सा त्यांनी शेअर केला.

ठळक मुद्देकेवळ अमिताभ यांनाच नाही तर त्या मुलीलाही अमिताभ आवडायचे. अमिताभसाठी ती तिचा मित्र प्राणलाही सोडायला तयार झाली होती.

कौन बनेगा करोडपती’मुळे चर्चेत असलेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला. होय, दिल्लीच्या कॉलेजात शिकत असतानाचा एक मजेशीर किस्सा त्यांनी शेअर केला. दिल्लीत कॉलेजात शिकत असताना डीटीसी बसमधून रोज ये-जा करणा-या एका मुलीवर अमिताभ लट्टू झाले होते.‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर एका स्पर्धकाने दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरावेळी अमिताभ यांना हा किस्सा आठवला आणि त्यांनी तो सर्वांसोबत शेअर केला.

दिल्लीत कॉलेजचे शिकत असताना अमिताभ दिल्लीच्या तीन मूर्ती भागात रहात होते. कॉलेजला जाण्यासाठी त्यांना बसने प्रवास करावा लागत होता. ही बस कनॉटप्लेस (सीपी) मागार्हून युनिवर्सिटीत जात होती. या मार्गावर खासकरून आयपी, मिरांडा हाऊसला जाणा-या सुंदर मुली बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी अमिताभ व त्यांचे काही मित्र या बसमध्ये सुंदर मुली चढण्याची वाट पहायचे.

हा किस्सा शेअर करताना अमिताभ यांनी सांगितले की, दिल्ली युनिव्हर्सिटीच्या किरोड़ीमल कॉलेजमध्ये शिकत असताना आम्ही काही मित्र रोज  डीटीसी बसमधून प्रवास करायचो. डीटीसी बस कनॉट प्लेस मार्गावरून जायची.  कधी एकदा कनॉट प्लेस येते, याची आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघायचो. कारण कनॉट प्लेसमधून अनेक सुंदर मुली बसमध्ये चढत असत.  कनॉट प्लेसमधून रोज बसमध्ये चढणारी एक मुलगी मला आवडू लागली होती. त्याकाळी मुलींसोबत आत्तासारखे बोलता येत नसे. त्यामुळे त्या मुलीशी मी कधीही बोललो नाही. पुढे अनेक वर्षांनंतर तीच मुलगी मला अचानक भेटली आणि त्यावेळी त्या मुलीने असा काही खुलासा केला की, मी थक्क झालो.   त्या मुलीचा आणखी एक मित्र होता आणि त्याचे नाव होते प्राण. ते दोघेही एकत्र त्या बसमध्ये चढत. पण ती मुलगी प्राणसाठी नाही तर माझ्यासाठी त्या बसस्टॉपवर यायची.एकंदर काय तर  केवळ अमिताभ यांनाच नाही तर त्या मुलीलाही अमिताभ आवडायचे. अमिताभसाठी ती तिचा मित्र प्राणलाही सोडायला तयार झाली होती.

 

टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपती