समाजातील वास्तव उत्तमरित्या पडद्यावर मांडणारा लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे (nagraj manjule). 'नाळ', 'सैराट', 'पिस्तुल्या' या गाजलेल्या चित्रपटांच्या यशानंतर नागराज मंजुळे यांनी 'झुंड (Jhund) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan ) मुख्य भूमिका साकारत आहेत. बिग बींनी ‘झुंड’(Jhund) या चित्रपटाच्या मानधनात कपात केल्याचे वृत्त आहे.
'झुंड'मध्ये अमिताभ बच्चन एका फुटबॉल (Amitabh Bachchan Jhund Fees) प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत, जो वंचित मुलांच्या गटाला फुटबॉलपटू बनवण्याच्या प्रयत्नात आहे. चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी खुलासा केला की, अमिताभ बच्चन यांचा चित्रपटावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे चित्रपटाला अडचणी येऊ लागल्यावर बिग बींनी त्यांची फी कमी करण्याची ऑफर दिली. निर्मात्याने सांगितले की, दिग्गज अभिनेत्याच्या टीमनेही बिग बींच्या पावलावर पाऊल टाकले आणि त्यांचं वेतन कमी केला.
'मिड-डे'शी बोलताना तो म्हणाला- 'बच्चन सरांना ही स्क्रिप्ट खूप आवडली. माफक बजेट असलेल्या चित्रपटात त्यांना कसं कास्ट करायचं याचा विचार करत असताना स्वत:चं मानधन कमी करून त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. माझ्यावर खर्च करण्यापेक्षा चित्रपटावर खर्च करा, असे ते म्हणाले. यानंतर त्यांच्या कर्मचार्यांनी त्यांच्या फीमध्येही कपात केली.
2018 मध्ये दिग्दर्शक मंजुळे यांनी या चित्रपटासाठी पुण्यात सेट बांधला होता, पण पैशांच्या कमतरतेमुळे तो काढावा लागला होता.सिंग म्हणतात, "आम्ही चित्रपटाचे शूटिंग नागपुरात केले, भूषण कुमार यांचे आभार, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला."