Join us

धमाका! प्रभासच्या सिनेमात दिसणार महानायक अमिताभ बच्चन, म्हणाला - स्वप्न सत्यात उतरतंय....

By अमित इंगोले | Updated: October 9, 2020 13:03 IST

तरण आदर्शने लिहिले की, अमिताभ-प्रभास-दीपिका... #Prabhas21 मध्ये (टायटल ठरलेलं नाही) अमिताभ बच्चन सुद्धा असतील.

दिग्दर्शक नाग अश्विनच्या प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या आगामी सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. दीपिका आणि प्रभासला एकत्र बघण्यासाठी फॅन्स आतुर झाले आहेत. अशात आता या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजून टायटल ठरलं नसलेल्या या सिनेमा महानायक अमिताभ बच्चन यांची एन्ट्री झाली आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने याबाबत ट्विट करून माहिती दिली.

तरण आदर्शने लिहिले की, अमिताभ-प्रभास-दीपिका... #Prabhas21 मध्ये (टायटल ठरलेलं नाही) अमिताभ बच्चन सुद्धा असतील. नाग अश्विन याचं दिग्दर्शन करणार आणि Vyjayanthi Movies हा सिनेमा प्रोड्यूस करणार आहे. २०२२ मध्ये हा सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.  ( प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरूष'मध्ये कियारा अडवाणीची दमदार एन्ट्री?)

अभिनेता प्रभासने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, फायनली, स्वप्न सत्य होणार आहे. लीजेंडरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. #NamaskaramBigB.  ('आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया!)

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबाबत सांगायचं तर ते अनेक प्रोजेक्ट्स करत आहेत. अमिताभ अयान मुखर्जीच्या सुपरनॅच्युरल थ्रीलर ब्रम्हास्त्रमध्येही दिसणार आहेत. यात त्यांच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय आहे. तसेच नागराज मंजुळेसोबतचा 'झुंड' हाही सिनेमा तयार आहे. (प्रभासच्या एका जबरा फॅनने वेधले सा-यांचे लक्ष, कारण जाणून व्हाल थक्क)

प्रभासबाबत सांगायचं तर तान्हाजी फेम दिग्दर्शक ओम राऊतच्या आगामी 'आदिपुरूष' सिनेमात प्रभास रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. पण अजून सीतेच्या भूमिकेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत.  

टॅग्स :अमिताभ बच्चनप्रभासदीपिका पादुकोणबॉलिवूडTollywood