Join us

अमिताभ बच्चन ‘कोरोनामुक्त’, रूग्णालयातून डिस्चार्ज; अभिषेक मात्र रूग्णालयातच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 5:25 PM

बिग बी यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी

ठळक मुद्देअमिताभ, ऐश्वर्या व आराध्या या तिघांचीही कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.

महानायक अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून कोरोनाला झुंज देत होते. रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. आता मात्र अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमिताभ कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.‘माझ्या वडिलांची ताजी कोव्हिड 19 चाचणी निगेटीव्ह आली आहे. ते लवकरच घरी असतील. तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनेसाठी आभार,’ असे ट्वीट अभिषेकने केले आहे.

याआधी अमिताभ यांची सुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचा देखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबावर असलेलं कोरोनाचं संकट दूर होऊ लागले आहे.

11 जुलैला रात्री बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचे निदान झाले होते. त्यानंतर अभिषेक बच्चनचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला होता तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. े. अभिषेक रूग्णालयात

अमिताभ, ऐश्वर्या व आराध्या या तिघांचीही कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. मात्र अभिषेक बच्चन अद्यापही रूग्णालयात आहे. ‘दुर्दैवाने मी अद्यापही कोरोना पॉझिटीव्ह आहे. मात्र मी सुद्धा कोरोनाला हरवून लवकरच घरी परतेल. पुन्हा एकदा तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनांसाठी धन्यवाद,’ असे अभिषेकने स्वत: ट्वीटमध्ये सांगितले आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन