ट्वीटरवर ब्लू टिक (Blue Tick) असणं हे सेलिब्रिटींसाठी खूपच महत्वाचं असतं. सोशल मीडियावर व्हेरिफाय होण्यासाठी आणि ब्लू टिकसाठी लोक पैसेही भरतात. मात्र ट्विटरवर काल एक विचित्र प्रकार घडला. अनेक सेलिब्रिटींचे ब्लू टिक ट्विटरवरुन गायब झाले आहेत. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आलिया भट(Alia Bhat) चाही समावेश आहे.
ट्विटरने काल गुरुवार 20 एप्रिल रोजी अनेकांचे ब्लू टिक काढून टाकले. भारतातील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचेही ब्लू टिक गायब झाले. अमिताभ बच्चन तर ट्विटरवर सतत अॅक्टिव्ह असतात. तसंच शाहरुख खान अनेकदा ट्विटरवरुन त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. या सेलिब्रिटींचे मिलियनमध्ये फॉलोअर्स असतात. ब्लू टिकमुळे नकली अकाऊंटपासून त्यांचं अकाऊंट वेगळं दिसतं. मात्र आता हेच ब्लू टिक गायब झालं आहे. काल ट्विटरने घोषणा केली की, ज्या लोकांचे ट्विटर पैसे भरुन व्हेरिफाय केले गेलेले नाही त्यांचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे.
या सेलिब्रिटींचे ब्लू टिक गायब
एलॉन मस्क यांनी ट्विटरचा कारभार सांभाळायला घेतल्यापासून काही ना काही नवीन गोष्टी घडत आहेत. भारतातील अनेक सेलिब्रिटींचे ब्लू टिक रातोरात गायब झाले आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आलिया भट शिवाय सीएम योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, प्रियंका गांधी या नेत्यांचेही ब्लू टिक काढण्यात आले आहेत. तसंच खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मासह इतर अनेक खेळाडूंचे ट्विटरवरील ब्लू टिक गेले आहे.