Join us  

Amitabh Bachchan : अन् अमिताभ बच्चन भर कार्यक्रमात सर्वांसमोर निर्मात्यांच्या पडले पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:15 AM

यंदाचा सर्वात मोठा चित्रपट 'कल्कि 2898 एडी' गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चत आहे.

यंदाचा सर्वात मोठा चित्रपट 'कल्कि 2898 एडी' गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चत आहे. सुपरस्टार प्रभास (Prabhas), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), कमल हासन यांसारख्या दिग्गजांसह  दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी सुद्धा सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाने प्रचंड लक्ष वेधून घेतले आहे. 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाचा एक कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी चित्रपटाची सगळी टीम उपस्थित होती.  कार्यक्रमादरम्यान अमिताभ यांच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

अमिताभ बच्चन यांनी सर्वांसमोर 'कल्कि 2898 एडी'  सिनेमाचे निर्माते अश्विनी दत्त यांचे आभार मानले आणि त्यांच्या पाया पडले. याचा एक व्हिडीओ समोर आहे आहे. ज्यामध्ये अमिताभ हे सी. अश्विनी दत्त यांच्या पाया पडण्यासाठी वाकले असता निर्माते काही पावलं मागे सरकले आणि त्यांनी अमिताभ यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते स्वत: अमिताभ यांच्या पायाशी वाकल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

निर्माते अश्विनी दत्त यांच्याबद्दल बोलताना अमिताभ म्हणाले, 'अश्विनी दत्त हे मी आतापर्यंत भेटलेल्या व्यक्तींपैकी सर्वात साधे आणि विनम्र व्यक्ती आहेत'. अमिताभ बच्चन यांनी पुढे म्हटले की,  सेटवर पोहोचणारे ते पहिले व्यक्ती असतात. कलाकारांच्या  सुरक्षितेची काळजी घेतली गेलीय का, याकडेही त्यांचं लक्ष असतं', या शब्दात अमिताभ यांनी आश्विनी दत्त यांचं कौतुक केलं. दरम्यान, अश्विनी  दत्त यांच्या साधेपणाचा कल्पना त्यांच्या पेहरावावरुनच आली. ट्राउजर पँट, पिवळं हाफ बाह्यांचं शर्ट अन् पायात स्लीपर असा सी. आसवानी दत्त यांचा पेहराव या कार्यक्रमात होता.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी 'कल्की 2898 एडी' मध्ये अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. नाग अश्विन दिग्दर्शित, कल्की 2898 एडी' हा वर्षातील सर्वात मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरेल यात शंका नाही. 'कल्कि 2898 एडी' सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय. वैजयंती मूव्हीज निर्मित हा सिनेमा 27 जून 2024 रोजी जगभरात रिलीज होणार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडियादीपिका पादुकोणप्रभासकमल हासन