Join us

बहुत गुरूर था...! अमिताभ बच्चन यांनी शेअर केली पोस्ट, नेटकर्‍यांनी पुन्हा केलं ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 17:05 IST

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात. रोज नवे फोटो, रोज नवे किस्से, कविता ते शेअर करत असतात. अर्थात अनेकदा या पोस्टमुळे ते ट्रोलही होतात.

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सध्या बिग बी अनेक चित्रपटांत बिझी आहेत. ब्रह्मास्त्र या सिनेमात ते रणबीर कपूर व आलिया भटसोबत दिसणार आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात. रोज नवे फोटो, रोज नवे किस्से, कविता ते शेअर करत असतात. अर्थात अनेकदा या पोस्टमुळे ते ट्रोलही होतात. सध्याही बिग बी असेच ट्रोल होत आहेत. ट्रोलिंगला कारण ठरली ती त्यांनी शेअर केलेली एक पोस्ट.

‘बहुत गुरूर था छत को छत होने परएक मंजिल और बनी, छत फर्श हो गई...’

अशा दोन ओळींची एक शायरी अमिताभ यांनी शेअर केली आहे. यावरून नेटकर्‍यांनी अमिताभ बच्चन यांनी जबरदस्त मजा घेतली.

बिग बींच्या या पोस्टवर काही नेटकर्‍यांनी तर अशा काही कमेंट्स केल्या की, त्या वाचून हसू आवरणार नाही. ‘कुल मिला कर बाबूजी एक खराब सिविल इंजीनिअर थे,’ अशी कमेंट एका युजरने केली.

एका युजरने तर या पोस्टचा संबंध पेट्रोल दरवाढीशी जोडला. ‘कुछ उम्र का और कुछ पेट्रोल के दाम का असर है. कभी कभी तो ट्विट की संख्या भी ऊपर नीचे हो जाती है,’ असे या युजरने लिहिले.फक्त कॉपी पेस्टच करा. खर्‍या मुद्यांवर बोलण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत एका युजरने त्यांना ट्रोल केले.

एका युजरने बिग बींच्या याच शायरीशी मिळताजुळता शेर सादर केला. ‘बहुत गुरूर था मुझे रेखा को अपना कहने पर, एक दिन जया आई और मेरा गुरूर मार कर फोड दी’, असे या युजरने लिहिले.

एकंदर काय तर एक पोस्ट शेअर करणे बिग बींना चांगलेच महागात पडले. त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सध्या बिग बी अनेक चित्रपटांत बिझी आहेत. ब्रह्मास्त्र या सिनेमात ते रणबीर कपूर व आलिया भटसोबत दिसणार आहे. याशिवाय झुंड, चेहरे, मे डे, गुडबाय हे त्यांचे सिनेमे येत्या काळात रिलीज होत आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चन