Lakshadweep vs Maldives: लक्षद्वीप आणि मालदीव मधील वादात आता महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही ट्वीट केलं आहे. सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी मालदीवला खडेबोल सुनावल्यानंतर आता अमिताभ बच्चनही (Amitabh Bachchan) मैदानात उतरले आहेत. विरेंद्र सेहवागने केलेलं ट्वीट रिट्वीट करत त्यांनी लक्षद्वीपला पाठिंबा दिला आहे.
बिग बी अमिताभ बच्चन कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतात. मालदीव आणि लक्षद्वीप वादाप्रकरणी त्यांनीही मत व्यक्त केलं आहे. विरेंद्र सेहवागचं ट्वीट शेअर करत ते लिहितात, 'विरु पाजी...हे खूपच समर्पक आहे आणि आपल्या जमिनीच्या अधिकाराचं आहे. मी लक्षद्वीप आणि अंदमानला गेलो आहे. खूपच सुंदर ठिकाणं आहेत. तिथला समुद्रकिनारा आणि अंडर वॉटर अनुभव तर अविश्वसनीय आहे. हम भारत है, हम आत्मनिर्भर है, हमारी आत्मनिर्भरता पे आँच मत डालिये'
भारतीयांनी फिरवली मालदीव पर्यटनाकडे पाठ
नेते जाहिद रमीझच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर भारतीय आणि मालदीवच्या नागरिकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. भारतीय लोकांचा संताप इतका वाढला की #BoycottMaldives ही मोहीम सुरू झाली. अनेक भारतीयांनी मालदीवच्या सुट्या रद्द केल्या आहेत.
मालदीव सरकारकडून नरमाईची भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानावर भारतीय उच्चायुक्तांनी तेथील सरकार समक्ष हा मुद्द मांडला. त्यानंतर मालदीव सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. सदर वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. सरकार त्यांच्या मताशी सहमत नसल्याचे म्हटले.