Join us  

Ohh No! अमिताभ बच्चन वर्ल्ड कप फायनल पाहायला जाणार, चाहत्याचं वाढलं टेंशन; वाचा का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 3:38 PM

बिग बी अमिताभ बच्चनदेखील भारतीय टीमला चिअर करण्यासाठी वर्ल्ड कप फायनल बघण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. पण, यामुळे क्रिकेटप्रेमींचं टेंशन वाढलं आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे.अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप फायनलचा थरार पाहायला मिळणार आहे. न्यूझीलंडला धूळ चारुन भारताने वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे वर्ल्ड कपबाबत भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय टीमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत. 

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता फायनलाही बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. बिग बी अमिताभ बच्चनदेखील भारतीय टीमला चिअर करण्यासाठी वर्ल्ड कप फायनल बघण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. पण, यामुळे क्रिकेटप्रेमींचं टेंशन वाढलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. अमिताभ यांनी भारताने न्यूझीलंडला हरवल्यानंतर एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी "मी जेव्हा सामना पाहत नाही, तेव्हा आपण जिंकतो" असं म्हटलं होतं. 

यानंतर अमिताभ बच्चन यांनी आणखी एक ट्वीट करत "आता मी जाऊ की नाही हा विचार करत आहे," असं म्हटलं होतं. त्यांच्या या ट्वीटमुळे आणि अमिताभ वर्ल्ड कप फायनल बघायला जाणार असल्यामुळे चाहत्यांचं टेंशन वाढलं आहे. बिग बी मॅच बघायला गेले तर आपण हरू की काय अशी भीती चाहत्यांना वाटत आहे. त्यांचं हे ट्वीट व्हायरल झालं असून त्यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट करत अमिताभ यांना मॅच पाहायला न जाण्याचा सल्ला दिला आहे. एकाने "नका जाऊ सर, आणि घरी पण मॅच बघू नका"  अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने "नका जाऊ...तुम्ही मॅच बघितली नाही तर भारत जिंकतो असं तुम्हीच म्हणाला होतात," असं म्हटलं आहे. 

भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप अंतिम सामना रविवारी(१९ नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याला रजनीकांत, कमल हसन, मोहनलाल,नागार्जुन, राम चरण हे कलाकार उपस्थिती दर्शविणार आहेत. तर सचिन तेंडुलकर, एम एस धोनी, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, यजुवेंद्र चहल हे क्रिकेटरही अंतिम सामना पाहण्याासाठी जाणार आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनआयसीसी आंतरखंडीय चषकऑफ द फिल्ड