Join us

वय वर्ष ८१, विनाब्रेक काम अन् जेवणही नाही..; अमिताभ बच्चन असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 15:20 IST

अमिताभ यांनी सोशल मीडियावर थक्क करणारा अनुभव शेअर केलाय. काय म्हणाले अमिताभ बघा क्लिक करुन

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे शहनशाह. अमिताभ गेली अनेक दशकं लोकांचं मनोरंजन करत आहेत. सिनेमा असो, मालिका असो वा रिअॅलिटी शो.  अमिताभ प्रत्येक माध्यमात सक्रीय आहेत. अमिताभ त्यांच्या ब्लॉगवर त्यांच्या आयुष्यातले अपडेट्स शेअर करत असतात. अशातच अमिताभ यांनी नुकताच त्यांचा एक खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. यात वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमाचा खुलासा केलाय.

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर शूटींगचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोत अमिताभ एकदम कॅज्युअल लूकमध्ये असून कारमधून उतरत आहेत. तर दुसऱ्या फोटोत अमिताभ काळ्या रंगाच्या थ्री पीस सूटमध्ये दिसत आहेत. यात ते व्हॅनिटी वॅनमध्ये पाहायला मिळत आहेत. हे फोटो कौन बनेगा करोडपति 16 च्या सेटवरचे आहेत. अमिताभ कौन बनेगा करोडपति 16 च्या नव्या सीझनच्या शूटींगमध्ये व्यस्त झाले आहेत. 

हे फोटो शेअर करुन अमिताभ लिहितात की, सध्या ते शूटींगमध्ये प्रचंड व्यस्त आहेत. सकाळी ९ ते ५ विनाब्रेक त्यांना काम करावं लागतंय. काम इतकं आहे की बिग बींना जेवायची सुद्धा फुरसत नाही. त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं गाडीतच बसून अमिताभ दुपारचं जेवण करत आहेत. याशिवाय क्रिकेटचे फॅन असणारे बिग बी IPL  चा आनंदही घेत आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षी बिग बींना इतकं व्यस्त पाहून आजच्या युवावर्गाला नक्कीच प्रेरणा मिळाली असेल, यात शंका नाही.

टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपती