‘ माझ्या मृत्यूनंतर माझी जी काही संपत्ती असेल ती, माझी मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांच्यात समान वाटण्यात येईल, असे tweet त्यांनी केले होते. या tweetला त्यांनी लैंगिक समानता , आपण सर्व समान आहोत हे हॅशटॅग दिले होते. सध्या अमिताभ रामगोपाल वर्मा ‘सरकार3’मध्ये बिझी आहेत. याशिवाय ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटातही ते बिझी आहेत. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधून अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवण्यात येणार असून, फिलिप मिडॉस टेलर यांच्या ‘कन्फेशन आॅफ ठग्स’ या कादंबरीवर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे.ALSO READ : अमिताभ बच्चन यांचा स्पेशल संदेश, ‘HER के बिना HERO भी O होता है’ या चित्रपटात आमिर आणि अमिताभ बाप लेकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचेही समजते आहे. आमिर खान मुलाच्या भूमिकेत तर अमिताभ बच्चन आमिरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील. अर्थात अद्याप काहीही फायनल झालेले नाही. या चित्रपटातील फिमेल लीडबद्दलही सध्या चर्चा ऐकायला मिळते आहे. फातिमा सना शेख, श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट यांची नावे या शर्यतीत असल्याचे मानले जात आहे.T 2477 - I proudly fly the National Tricolor on top of my home .. Do you ..? You must !! pic.twitter.com/EPom1vMrIs— Amitabh Bachchan (@SrBachchan) 27 March 2017
अमिताभ बच्चन यांच्या घरावर फडकला तिरंगा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 7:12 AM
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या घरावरच तिरंगा सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. होय,अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या राहत्या बंगल्यावर ...
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या घरावरच तिरंगा सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. होय,अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या राहत्या बंगल्यावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवला आहे. आपल्या Twitter अकाऊंटवरून त्यांनी या तिरंग्याचा फोटो पोस्ट केला आहे. ‘मी मोठ्या अभिमानाने माझ्या घरावर तिरंगा फडकवला आहे आणि तुम्ही? तुम्ही सुद्धा असे करायला हवे...’ असे tweet या फोटोसोबत त्यांनी केले आहे.अमिताभ यांनी हा फोटो शेअर करून देशप्रेम व्यक्त केले आहे. त्यांच्या मनात ओतप्रोत भरलेले देशप्रेमचं यातून दिसते. अमिताभ कायम वेगवेगळ्या सामाजिक मुद्यांवर आपली भूमिका मांडत असतात. अलीकडे महिला दिनी त्यांनी स्त्री-पुरूष समानतेवर एक सुंदर संदेश समाजाला दिला होता.