Join us

​आत्तापर्यंत रिलीज झालेला नाही अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ सिनेमा! बिग बी म्हणाले, प्लीज असे करू नका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 8:44 AM

कुठलाही चित्रपट असो, त्यामागे बरेच कष्ट असतात. केवळ त्या चित्रपटातील कलाकारांचे वा दिग्दर्शक -निर्मात्यांचेच नाही तर स्पॉट बॉयपासून अनेकांचे. ...

कुठलाही चित्रपट असो, त्यामागे बरेच कष्ट असतात. केवळ त्या चित्रपटातील कलाकारांचे वा दिग्दर्शक -निर्मात्यांचेच नाही तर स्पॉट बॉयपासून अनेकांचे. साहजिकच एखादा चित्रपट तयार होऊन डबाबंद होऊन धूळखात पडला असेल तर त्याचे दु:ख होणे साहजिक आहे. विशेषत: त्या चित्रपटाशी संबंधित कुठल्याही संवेदनशिल मनाला हे दु:ख पचवणे कठीण जाते. असेच काही झालेय, ते महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल. होय, अमिताभ यांचा एक चित्रपट तयार आहे. पण काही मतभेदांमुळे हा चित्रपट अद्याप रिलीज झालेला नाही. अमिताभ यांनी याबद्दल तीव्र खंत व्यक्त करत, निर्मात्यास हा चित्रपट रिलीज करण्याचे आवाहन केले आहे. ‘शूबाईट’ असे या चित्रपटाचे नाव आहे.खरे तर सर्वप्रथम अमिताभ यांच्या एका चाहत्याने अमिताभ आणि ‘शूबाईट’च्या निर्मात्यास हा चित्रपट रिलीज करण्याची विनंती केली. यानंतर अमिताभ यांनी या चाहत्याच्या  ट्विटला उत्तर देताना,‘शूबाईट’ रिलीज करण्याची मागणी आणखी प्रखरपणे पुढे रेटली. ‘प्लीज...प्लीज...प्लीज...युटीव्ही आणि डिज्नी वा अन्य कुणीही ज्यांच्याकडे हा चित्रपट आहे....फक्त हा चित्रपट रिलीज करा. या चित्रपटासाठी अनेक कष्ट घेतले गेले आहेत. रचनात्मकता अशी मरू देऊ नका,’ असे अमिताभ यांनी लिहिले आहे.ALSO READ : ‘या’ फोटोमुळे अमिताभ बच्चन यांना मिळाला होता नकार!सुप्रसिद्ध दिग्दर्शत शूजीत सरकार यांनी ‘शूबाईट’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झालेय. चर्चा खरी मानाल तर काही मतभेदांमुळे चित्रपट रखडला आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटात अमिताभ यांच्याशिवाय सारिका, दिया मिर्झा, जिमी शेरगिल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासारखे बडे स्टार्स आहेत. आयुष्याचा शोध घेत, दीर्घ प्रवासाला निघालेल्या एका व्यक्तीची कथा यात आहे. या कथेवर शूजीत सरकार दीर्घकाळापासून काम करत होते. आधी पर्सेप्ट पिक्चर कंपनीसोबत मिळून ‘जॉनी वॉकर’ नावाने हा चित्रपट बनवण्याचा निर्णय झाला होता. पण हा चित्रपट मार्गी लागू शकला नाही. यानंतर युटीव्ही मोशनसोबत  ‘शूबाईट’ नावाने शूजीत सरकार यांनी या चित्रपटावर काम सुरु केले. पण यादरम्यान पर्सेप्ट पिक्चरने कारदेशीर कारवाई केली आणि रिलीजवर स्थगिती आणली.