Join us

अमिताभ बच्चन यांच्या हाताची सर्जरी; सोशल मीडियावर शेअर केले काही खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 18:17 IST

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत.

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक कलाकारांसोबत विविध चित्रपटात काम केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेकदा बिग बींना दुखापतही झाली आहे. आता अलीकडेच त्यांनी खिलाडी कुमार अक्षय आणि  अभिनेता सूर्यासोबत एक जाहिरात शूट केली.  शुटिंगचे काही खास फोटो अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केले. यासोबतच बिग बींनी आपल्या हातावर झालेल्या शस्त्रक्रियेचा खुलासाही केला.

बिग बींनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान काढलेले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.  या फोटोंमध्ये अमिताभा यांच्या हातांवर बँड दिसून येतोय. तसेच या फोटोंमध्ये बिग बी दाक्षिणात्य अभिनेता सूर्या आणि अक्षय कुमारसोबत दिसत आहेत. तर एका फोटोमध्ये अमिताभ हे अक्षय कुमारसोबत हाताच्या शस्त्रक्रियेवर चर्चा करताना दिसत आहेत.  अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि सूर्या या सुपरस्टार्संना एकत्र पाहून त्यांचे चाहते खूश झाले आहेत. 

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते अनेक वर्षांपासून टीव्हीवरील लोकप्रिय 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) शो होस्ट करत आले. या शोने बिग बींना खूप प्रसिद्धी आणि प्रेम दिलं आहे. नुकताच KBC 15 चा शेवटचा एपिसोड 29 डिसेंबर रोजी टेलिकास्ट झाला. या सिझनचा हा शेवटचा एपिसोड होता. तर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या गणपत चित्रपटात अमिताभ दिसले. याआधी त्यांनी घूमर या चित्रपटात कॅमिओ केला होता. याशिवाय, अमिताभ हे रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'थलाइवर 170' मध्येही पाहायला मिळणार आहेत.  

टॅग्स :अमिताभ बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडअक्षय कुमार