Amitabh Bachchan Buys Office Space :बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या त्यांच्या आगामी 'Kalki 2898 AD' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. याशिवाय त्यांची आणखी एका गोष्टीमुळे चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ यांनी मुंबईत एक-दोन नव्हे, तर तीन व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. विशेष म्हणजे, या मालमत्तांची किंमत तब्बल 60 कोटी रुपये आहे. 20 जून 2024 रोजीच या मालमत्तांची नोंदणी झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी सुमारे 60 कोटी रुपयांना 8,429 स्क्वेअर फूटच्या तीन 'ऑफिस स्पेस' खरेदी केल्या आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवरील सिग्नेचर बिल्डिंगमधील या तीन मालमत्ता आहेत. यासोबत तीन कार पार्किंगचाही समावेश आहे.
2023 मध्ये चार मालमत्तांची खरेदी अमिताभ यांनी वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून एकूण 4,894 चौरस फूट जागा 31,498 रुपये प्रति चौरस फूट या दराने खरेदी केली आहे. यासाठी त्यांनी 3.57 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले आहे. याआधीही 2023 मध्ये अमिताभ बच्चन यांनी जवळपास 29 कोटी रुपयांना चार व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्या होत्या.
अभिषेक बच्चनने 6 अपार्टमेंट खरेदी केले अलीकडेच अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन याने 6 अपार्टमेंट खरेदी केल्याची बातमी आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चनने मुंबईतील बोरिवली भागात ओबेरॉय रियल्टीच्या ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 6 अपार्टमेंट खरेदी केले, ज्यांची किंमत 15.42 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
'कल्की 2898 एडी'मध्ये अमिताभ अश्वत्थामाच्या भूमिकेतअमिताभ बच्चन 'कल्की 2898 एडी' या पॅन इंडिया सायन्स फिक्शन चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 27 जून 2024 रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये अमिताभ अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसतील. बिग बी व्यतिरिक्त 'कल्की 2898 एडी' मध्ये प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि कमल हासन यांच्याही भूमिका आहेत.