Join us

अमिताभ बच्चन यांच्या या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 2:51 PM

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत शीतल जैन अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत होते.

ठळक मुद्देबॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांचे सेक्रेटरी शीतल जैन यांचे नुकतेच निधन झाले. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत शीतल जैन अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत होते.

बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांचे सेक्रेटरी शीतल जैन यांचे नुकतेच निधन झाले. जवळजवळ 35 वर्षं ते अमिताभ यांचे सेक्रेटरी म्हणून काम करत होते. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेकांसोबत त्यांचे संबंध खूपच चांगले होते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत शीतल जैन अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत होते. अमिताभ बच्चन यांचा सुरुवातीचा संघर्षाचा काळ असो की स्टारडम मिळाल्यानंतरचा काळ असो... शीतल जैन यांनी या सगळ्या गोष्टी खूपच जवळून पाहिल्या आहेत. ते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांच्या खूपच जवळचे होते.

शीतल जैन यांनी अमिताभ यांचे सेक्रेटरी म्हणून काम करण्यासोबतच बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच गोविंदा मुख्य भूमिकेत होता. तसेच एका गाण्यात माधुरी दीक्षितने देखील हजेरी लावली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. 

अमिताभ यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांसोबत शीतल जैन यांचे खूप चांगले संबंध होते. त्यांच्या निधनानंतर अनुपम खेर यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, शीतल जैन यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटले. अमिताभ बच्चन यांचे ते सेक्रेटरी असल्याने मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. ते खूपच हुशार आणि अतिशय विनम्र होते. त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्याची देव शक्ती देवो ही इश्वरचरणी प्रार्थना...

 

शीतल जैन यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चन