Join us  

Amjad Khan :'गब्बर' फेम अमजद खान यांनी जन्मानंतर पाहिला नाही लेकाचा चेहरा; पत्नी रुग्णालयात रडायची कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 11:00 AM

Amjad Khan : 'गब्बर सिंग' ही व्यक्तिरेखा साकारून अमजद खान यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

'ये हाथ मुझे दे दे ठाकूर...' हा बॉलीवूडमधील सर्वात अविस्मरणीय संवादांपैकी एक संवाद आहे. अनेक वर्षापूर्वी आलेल्या ‘शोले’ या चित्रपटातील पात्र आणि संवाद आजही मुलांच्या लक्षात राहतात यावरून चित्रपटाच्या यशाचा अंदाज लावता येतो. या चित्रपटात 'गब्बर सिंग' ही व्यक्तिरेखा साकारून अमजद खान (Amjad Khan) यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटात खलनायकाची भूमिका करून अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत नवीन उंची गाठली, परंतु रमेश सिप्पीचा चित्रपट साइन करण्याआधीच अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यातून जात होता.

अमजद खान यांचा मुलगा शादाब खान याने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या जन्माच्या वेळी त्याच्या वडिलांकडे हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठीही पैसे नव्हते. बिल भरू न शकल्याने अमजद खान मुलाच्या जन्मानंतर अनेक दिवस पत्नीला भेटायला गेले नाहीत. 'गब्बर सिंग'च्या मुलाने त्याच्या मुलाखतीत सांगितले होतं की, त्याची आई, वडील पाहायला येत नसल्यामुळे रुग्णालयात रडायची.

पैशांच्या कमतरतेमुळे अभिनेता कुटुंबाला भेटायला जाऊ शकला नाही. त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीची इतकी लाज वाटली की त्यांनी आपल्या पत्नीला बरेच दिवस हॉस्पिटलमध्येच राहू दिले. जन्मानंतर मुलाचा चेहरा देखील पाहिला नाही. 'हिंदुस्तान की कसम' चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन आनंद यांना अमजद खान यांच्या परिस्थितीबद्दल कळले तेव्हा त्यांनी लगेचच अमजद खान यांच्या मदतीसाठी धाव घेतली.

चेतन आनंद यांनी हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी अमजद खान यांना 400 रुपये दिले, त्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाचा चेहरा पाहायला मिळाला. शादाबनेही याच मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या वडिलांनी 'शोले'वर साईन केला होता त्याच दिवशी तो आणि त्याची आई हॉस्पिटलमधून घरी गेली होती. 'शोले'ने अमजद खान यांचे नशीब पालटले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :बॉलिवूड