Join us

रणवीर सिंगनंतर '८३' सिनेमात या पंजाबी अभिनेत्याची एंट्री, साकारणार 'या' क्रिकेटरची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 6:00 AM

'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.

ठळक मुद्देमे महिन्यापासून या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहेरणवीर सिंग कपिल देव आणि बलविंदर सिंधू यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले आहेत

'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. 

रणवीर सिंगनंतर बलविंदर सिंग संधू यांच्या भूमिकेसाठी पंजाबमधील लोकप्रिय अभिनेता आणि गायक एम्मी विर्कचे नाव फायनल करण्यात आले आहे. मे महिन्यापासून या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहे. याआधी रणवीर सिंग कपिल देव आणि बलविंदर सिंधू यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले आहेत.  या सिनेमात रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारण्याची ऑफर दीपिका पादुकोणला देण्यात आली होती. मात्र तिने ती करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

 याच दरम्यान रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३'साठी दीपिका पादुकोणला देखील विचारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. निर्मात्यांनी या चित्रपटात दीपिका कपिल देवची पत्नी रोमीची भूमिका करण्यासाठी विचारले व निर्मात्यांच्या नुसार दीपिका हे काम एका आठवड्यात पूर्ण करू शकते. मात्र दीपिका पादुकोणच्या जवळच्या सूत्रांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, सध्या दीपिकाची बॉक्स ऑफिसवर असलेल्या ब्रॅण्ड व्हॅल्यूनुसार ती स्पेशल अपियरन्स करू शकणार नाही.

८३' बाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. लवकरच रणवीर या सिनेमासाठी कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' सिनेमामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :रणवीर सिंग८३ सिनेमाकपिल देव