Join us

‘कॉमन मॅन’चा हीरो अमोल पालेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 10:47 AM

वाढदिवसानिमित्त त्यांना ‘सीएनएक्स मस्ती टीम’कडून हार्दिक शुभेच्छा.

सभ्य, सोज्वळ, प्रामाणिक अशी व्यक्तीरेखा असलेला एक हरहुन्नरी कलाकार अमोल पालेकर यांच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला. सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारा म्हणून पालेकर यांना प्रेक्षकवर्गाची पसंती मिळाली.‘गोलमाल’,‘छोटी सी बात’,‘चितचोर’, ‘बातों बातों में’ अशा त्यांच्या काही दर्जेदार चित्रपटांची नावे सांगता येतील. केवळ हिंदी भाषेच्या चौकटीत बंदिस्त न राहता त्यांनी मराठी, बंगाली, मल्याळम आणि कानडी भाषेमध्येही काम केलेले आहे.सत्तरच्या दशकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजतागायत सुरू आहे. त्यांचे कार्य आणि समर्पणाला सलाम... वाढदिवसानिमित्त त्यांना ‘सीएनएक्स मस्ती'कडून हार्दिक शुभेच्छा...अष्टपैलू कलाकार :अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ मध्ये मुंबईत झाला. कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांना अमोलशिवाय तीन मुली नीलम, रेखा आणि उन्नती.  त्यांनी ‘सर जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्स’ येथे फाईन आर्ट्सचे शिक्षण घेतले. ‘पेंटर’ म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरूवात केली.                                                                      स्टार तिगडी : अभिनेत्री रजनी शर्मा, अमोल पालेकर आणि अंबिका१९६७ पासून त्यांनी मराठी, हिंदी थिएटरमध्ये कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून उत्स्फु र्त सहभाग नोंदवला होता. १९७१ मध्ये मराठी चित्रपट ‘शांतता कोर्ट चालू आहे’ यामधून डेब्यू के ला. त्यानंतर १९७२ मध्ये सत्यदेव दुबे यांच्यासोबत मराठीत थिएटर करायला सुरूवात केली.१९७४ मध्ये दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांच्या ‘रजनीगंधा’ चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून घेण्यात आले. ‘मध्यमवर्गीय कॉमेडी’ म्हणून यांचे चित्रपट प्रचलित झाले. १९८६ पर्यंत त्यांनी अभिनयाचे ‘चार चांद’ लावले. अभिनयानंतर निर्मितीक्षेत्राची धरलेली साथ त्यांनी अद्यापही सोडलेली नाही. ‘उत्कृष्ट अभिनेता’ म्हणून एक फिल्मफेअर आणि सहा राज्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.उत्कृष्ट दिग्दर्शक :हरहुन्नरी अभिनेता म्हणून अमोल पालेकरांनी नाव तर कमावलेच पण दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही आपला वेगळा ठसा त्यांनी उमटवला. ‘एक उत्कृष्ट अभिनेता चांगला दिग्दर्शकही होऊ शकतो,’ असे त्यांना वाटते. दिग्दर्शक म्हणून त्यांनी साकारलेले चित्रपटही खूप गाजले. धीरगंभीर विषय, आशयगहन कथानक, सामान्य व्यक्तीची स्टोरी हे त्यांच्या दिग्दर्शनाचे विशेष.प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारे विषय त्यांनी चित्रपटाचे कथानक म्हणून स्वीकारले. ‘अनकही’, ‘थोडासा रूमानी हो जाये’, ‘बनगरवाडी’, ‘दायरा’, ‘आहट’,‘ कायरे’, ‘ध्यासपर्व’, ‘पहेली’, ‘क्वेस्ट’, ‘समांतर’, ‘अ‍ॅण्ड वन्स अगेन’, ‘धूसर’ हे त्यांचे काही विशेष चित्रपट.                                                                       कॉमन मॅन्स हीरो : अमोल पालेकरप्रादेशिक भाषांमधील उल्लेखनीय चित्रपट :कलाकार तोच जो विविध भाषांमध्ये स्वत:ची कला सिद्ध करेल. मराठी माणूस असूनही त्यांनी हिंदीबरोबरच मल्याळम, कानडी, बंगाली, इंग्रजी भाषांमध्येही उत्कृष्ट अभिनय केला. ‘मदर’ (बंगाली),‘कलंकिनी’ (बंगाली),‘चेना अचेना’(बंगाली), ‘कन्नेश्वरा रामा’(कानडी),‘पेपर बोट्स’(कानडी आणि इंग्लिश),‘ओलंगल’ (मल्याळम) या चित्रपटांमध्ये काम करून स्वत:चे वेगळेपण आणि कार्यकौशल्य दाखवून दिले. ‘तरूण’ म्हातारा :अमोल पालेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्व. ८०च्या दशकातील सामान्य व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारायचे. त्यामुळे ते रसिकवर्गाला जवळचे वाटू लागले. त्यांचे साधे राहणीमान, रूबाबदार देहबोली, तडफदार व्यक्तीमत्त्व अशी त्यांचे वर्णन करता येईल. चित्रपटातील त्यांची गाणी, संवाद हे लोकप्रिय तर आहेच पण ‘फॅशन आयकॉन’ म्हणूनही त्यांना ओळखले जाते.चित्रपटांबरोबरच नंतर त्यांनी टीव्ही सीरियल्समध्येही त्यांचे नशिब आजमावून पाहिले. ‘कच्ची धूप’,‘नकाब’, ‘पाऊलखुना’,‘करिना करिना’,‘मृगनयनी’,‘आ बैल मुझे मार’,‘एक नयी उम्मीद -रोशनी’ या मालिकांमध्ये त्यांनी उत्तम अभिनय केला. चाहत्यांच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याची ही शक्कल त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करून साध्य केली. त्यांची काही प्रसिद्ध गाणी :1. गोरी तेरा गाव बडा प्यारा - चितचोर                                             2. जानेमन जानेमन तेरे दो नयन - छोटी सी बात                                             3.आनेवाला पल जानेवाला हैं - गोलमाल                                              4. श्याम रंग रंगा रे - अपने पराये                                             5. ना बोले तुम ना मैंने कुछ कहां - बातों बातों में