मलायकाचे काही खरं नाही, आधी अर्जुन कपूर आता करिना, जाणून घ्या 'या' फोटोवेळी घडलेला किस्सा 'Kiss' चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 04:20 PM2021-02-01T16:20:12+5:302021-02-01T16:25:40+5:30
मलायका अरोराची बहिण अमृता अरोराच्या बर्थ डेची शानदार पार्टी झाली. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना तिच्या घरी पार्टीसाठी हजेरी लावली होती. त्यादरम्यानचा हा फोटो समोर आला आहे.
कधी अर्जुनला देते आपल्या ओठांचा गोडवा तर कधी करिनाशी घेते किसची झप्पी ही आहे बॉलिवूडची बिल्लो रानी म्हणजेच मलायका अरोराची किस लीला. नुकताच मलायका अरोराची बहिण अमृता अरोराच्या बर्थ डेची शानदार पार्टी झाली. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना तिच्या घरी पार्टीसाठी हजेरी लावली होती. त्यादरम्यानचा हा फोटो समोर आला आहे. या फोटोत तुम्हाही पाहू शकता.
की मलायका करिनाची किस घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण करिनानेही तिच्यापासून थोड्या अंतरावर असल्यामुळे मलायकाला काही तसे करणे शक्य झाले नाही आणि नेमका त्यांचा हा कॅन्डीड फोटो कॅमे-यात कैद झाला. मजेशीर वाटणारा हा फोटो सध्या सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकजण लाईक्स कमेंटस तर करतच आहेत मात्र संमिश्र प्रतिक्रीया जास्त पाहायला मिळत आहे. या फोटोमुळे अमृताच्या बर्थ डे पार्टीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मलायकाचीच जोरदार चर्चा रंगत आहे.
मलायका अरोराने एका मुलाखतीत सांगितले होते की, आजही भारतीय समाजात घटस्फोटीत महिलेला मुव्ह ऑन होणे खूप कठीण आहे. तर दुसरीकडे पुरूषांना नवीन नात्यात जाणे आणि नॉर्मल जीवन जगणं खूप सहज आहे.यापूर्वी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलाइका म्हणाली होती की, 'पुरुष जेव्हा पुढे निघून जातो तेव्हा काही फरक पडत नाही, परंतु जेव्हा एखादी स्त्री तसं करते ते तेव्हा पाप आहे, का?' जेव्हा एखादा माणूस त्याच्यापेक्षा लहान असलेल्या महिलेला डेट करतो, तेव्हा लोक त्याला ड्यूड म्हणतो, परंतु जर एखादी स्त्री तिच्यापेक्षा लहान मुलाला डेट करते तेव्हा सगळ्यांना ते खटकते.
मलायका म्हणाली, 'नेहमीच हा भेदभाव होत आला आहे. हे वाईट आहे आणि मला आशा आहे की यात बदल होईल. बरेच काही बदलत आहे परंतु तिथे पोहोचायला अजून थोडा वेळ लागेल.मलायका अरोराने २०१९मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवशी त्यांचं नांत ऑफिशल केलं होतं.
मलायकाने अर्जुनबरोबर तिचा फोटो पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तसे, मलायका आणि अर्जुन यापूर्वीही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते, परंतु तोपर्यंत त्यांनी हे स्वीकारलेले नव्हते की ते एकमेकांना डेट करतायेत.