Join us

अद्धभूत प्रेमकथेचा आज अखेर, अमृता प्रीतम यांचे इमरोज काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 3:18 PM

अमृता प्रीतम आणि इमरोज यांच्या अनोख्या प्रेमकहाणीचा आज अखेर झाला. 

प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज याचं मुंबईत वृद्धापकाळामुळे आज (22 डिसेंबर 2023 ) निधन झालं आहे. वयाच्या 97व्या वर्षी त्यांनी राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला.  इमरोज यांच्या निधनावर साहित्य जगतात शोककळा पसरली आहे. अमृता प्रीतमसोबतच्या नात्यानंतर इमरोज खूप लोकप्रिय झाले होते. दोघांनी कधीही लग्न केले नाही, परंतु 40 वर्षे ते एकमेकांसोबत राहिले. अमृता प्रीतम आणि इमरोज यांच्या अनोख्या प्रेमकहाणीचा आज अखेर झाला. 

इमरोज यांचे मूळ नाव इंद्रजित सिंग होते. इमरोज यांचा जन्म 1926 मध्ये लाहोरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात झाला. इमरोज यांनी जगजीत सिंग यांच्या 'बिरहा दा सुलतान' आणि बीबी नूरनच्या 'कुली रह विचार'सह अनेक प्रसिद्ध एलपीचे पहिले पान डिझाइन केले होते. अमृता यांचे 2005 मध्ये निधन झाले.

अमृताच्या मृत्यूनंतरही इमरोज जवळजवळ अज्ञात जीवन जगत राहिले.  इमरोज यांनी त्याच्या शेवटच्या वर्षांत लोकांना भेटणे बंद केले होते.  इमरोज यांच्या निधनानंतर  कॅनडातील इक्बाल महल यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले,  1978 पासून वैयक्तिकरित्या ओळखत होतो. अमृता त्याला 'जीत' म्हणायची, असेही त्यांनी सांगितले. 

 इमरोज आणि अमृता प्रीतम लग्नाच्या बंधनात न अडकताही प्रेमाच्या नात्यात चाळीस वर्ष घट्ट बांधले गेले होते.  या दोघांची प्रेमकहाणी नेहमीच चर्चेत राहिली. अमृता प्रीतम यांनीही 'रसीदी टिकट' या आत्मचरित्रात इमरोज यांच्याबद्दल लिहलं. या पुस्तकात अमृता यांनी त्यांच्या नाते उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अमृता आणि इमरोज यांच्या वयात सात वर्षांचा फरक होता. 2005 मध्ये अमृताचे निधन झाले. मृत्यूपूर्वी अमृताने इमरोजसाठी 'मैं तुम्हें फिर मिलूंगी' अशी कविता लिहिली होती. इमरोज तिच्या मृत्यूनंतर कवी बनला. त्यांनी अमृताची प्रेमकविता पूर्ण केली होती. त्याचे नाव होते 'उसने जिस्म छोड़ा है, साथ नहीं'. 

 

 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड