Join us

आरजे अनमोलसोबत केले आहे अमृता रावने लग्न, वाचा त्यांची लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 7:00 AM

2016 मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले होते. ट्विटरद्वारे ही बातमी सांगत तिने तिच्या फॅन्सना धक्का दिला होता.

ठळक मुद्देग्लॅमर इंडस्ट्रीचा भाग असले तरी अमृता व अनमोल अतिशय खासगी आयुष्य जगणे पसंत करतात.

शाहिद कपूरच्या इश्क विश्क या चित्रपटातील ती निष्पाप, चुलबुली हिरोईन आठवते का? पुढे ती विवाह चित्रपटातही शाहिदसोबत दिसली. होय आम्ही बोलतोय ते अभिनेत्री अमृता रावबद्दल... अमृताने मैं हूँ ना, सत्याग्रह यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बनवण्यात आलेल्या ठाकरे या चित्रपटात देखील ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

2016 मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले होते. ट्विटरद्वारे ही बातमी सांगत तिने तिच्या फॅन्सना धक्का दिला होता. लग्न करण्यापूर्वी अमृता आणि अनमोल यांनी जवळजवळ एकमेकांना सात वर्षं डेट केले. पण त्यांनी ही गोष्ट सगळ्यांपासून दडवून ठेवली होती. अमृता आणि अनमोलची भेट अमृताच्या एका मुलाखतीच्या दरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. पण सुरुवातीला केवळ त्यांच्या दोघांमध्ये मैत्री होती. पण त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याच दरम्यान त्या दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले असे म्हटले जाते.

ग्लॅमर इंडस्ट्रीचा भाग असले तरी अमृता व अनमोल अतिशय खासगी आयुष्य जगणे पसंत करतात. त्यांना एक मुलगा देखील आहे.

टॅग्स :अमृता राव