‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल पहिल्यांदाच आई-बाबा झाले झालेत. गेल्या 1 नोव्हेंबरला अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. अमृता व अनमोलने सोशल मीडियावर चाहत्यांना मुलासाठी नाव सुचवण्याची विनंती केली होती. फायनली, अमृता-अनमोलने आपल्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. सोबत आपल्या बाळाचा पहिला फोटोही शेअर केला आहे. या फोटोत बाळाचा चेहरा दिसत नाही. त्याच्या हात तेवढाच दिसतो.अनमोल व अमृताने आपल्या मुलाचे नाव वीर ठेवले आहे. हॅलो, आमचा मुलगा वीरला भेटा, असे लिहित अनमोल व अमृताने मुलाचा फोटो शेअर केला आहे.
अमृताने अनेक महिने प्रेग्नंसीची गोष्ट लपवून ठेवली होती. अमृता लॉकडाऊनआधीच प्रेग्नंट होती. अलीकडे अमृता व तिचा पती आर जे अनमोल खारमधील एका क्लिनिक बाहेर दिसलेत. यावेळी अमृताचा बेबी बम्प स्पष्ट दिसला. यानंतर ती प्रेग्नंट असल्याची बातमी सर्वांना कळली.
एका बड्या स्टारने फोन केला अन् अमृता रावच्या हातचा ‘चित्रपट’ गेला...!!
शाहिद कपूरसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर अमृता रावने तोडली चुप्पी, म्हणाली- आम्ही मित्रदेखील नाही ग्लॅमर इंडस्ट्रीचा भाग असले तरी अमृता व अनमोल अतिशय खासगी आयुष्य जगणे पसंत करते. 2016मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता व अनमोल 7 वर्षे डेटींग करत होते. अर्थात अमृताने हे सगळे दडवून ठेवले. अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याचदरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली.
अमृताने 2002 मध्ये ‘अब के बरस’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यांनतर ती ‘द लीजेंड आॅफ भगत सिंह’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटाने दिली.
अमृता राव बॉलिवूडमध्ये आली. पण तिची इमेज ‘गर्ल - नेक्स्ट -डोर’अशीच बनून राहिली. आपल्या करिअरमध्ये ती कुठल्याही विवादात अडकली नाही. पण अशी एक वेळ आली की, करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या ब्रेकअपसाठी अमृता जबाबदार असल्याची चर्चा झाली.