Join us  

शाहिदच्या आईसमोर अमृताने लगावली होती त्याच्या कानशिलात; 'इश्क विश्क'च्या सेटवर घडला होता किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 10:27 AM

Amrita rao: 'इश्क विश्क'च्या सेटवर शाहिदला बसली होती चपराक; या कारणामुळे अमृता रावने लगावली होती त्याच्या कानशिलात

उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि पर्सनालिटी या तिघांच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे शाहिद कपूर (shahid kapoor).  लोकप्रिय अभिनेत्याचा लेक असूनही शाहिदचा इंडस्ट्रीतील स्ट्रगल काही चुकला नाही. बऱ्याच सिनेमात काम केल्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला. शाहिदने 'विवाह', 'इश्क विश्क', 'कबीर सिंग', 'फिदा', 'जब वी मेट' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा दिले आहेत. त्यामुळे त्याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. यात त्याची आणि अभिनेत्री अमृता रावसोबतची जोडी विशेष लोकप्रिय झाली.

'विवाह', 'इश्क विश्क' या सिनेमात दोघांनाही एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यामुळे पडद्यावर त्यांची जोडी हिट ठरली. परंतु, एका सिनेमाच्या सेटवर अमृताने चक्क शाहिदच्या कानशिलात लगावली होती हे फार कमी जणांना माहित आहे. इश्क विश्कच्या सेटवर अमृताने शाहिदच्या कानशिलात लगावली होती. परंतु, हे खऱ्या आयुष्यात नसून फक्त सिनेमासाठी तिने केलं होतं.

'इश्क विश्क' या सिनेमात एका सीनमध्ये अमृताला शाहिदच्या कानाखाली मारायची होती. परंतु, या सिनेमाच्या सेटवर शाहिदची आईसुद्धा होती. त्यामुळे आईसमोर शाहिदला मारणं अमृताला पटत नव्हतं. परिणामी, ती योग्य सीन देऊ शकत नव्हती.आपल्या उपस्थितीमुळे अमृताला शाहिदला कानशिलात मारतांना अवघडल्यासारखं होतंय हे जेव्हा निलम (शाहिदची आई) यांना कळलं त्यावेळी त्यांनी अमृताची समजूत काढली. "हे बघ हे तुझं काम आहे आणि तुला ते चांगल्या प्रकारे करायचं आहे", असं निलम तिला म्हणाल्या.

दरम्यान, निलम यांनी समजूत काढल्यानंतर अमृताने मोठ्या धिटाईने शाहिदच्या कानशिलात लगावली आणि परफेक्ट शॉट दिला. सध्या अमृता अभिनयापासून दूर आहे. परंतु, ती तिच्या पॉडकास्टच्या माध्यमातून कायम सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असते. तर, शाहिद नुकताच 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमात झळखला होता.

टॅग्स :बॉलिवूडशाहिद कपूरअमृता रावसेलिब्रिटीसिनेमा