Join us

अमृता रावने तब्बल १९ महिन्यांनंतर घेतला रेस्टॉरंट फूडचा आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 16:54 IST

२०१६ मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले होते. ट्विटरद्वारे ही बातमी सांगत तिने तिच्या फॅन्सना धक्का दिला होता.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या घरी त्यांचे पहिले अपत्य वीर याचे आगमन झाले. गरोदर असल्यापासून ते बाळंतपणापर्यंतच्या काळात कोरोना संकटकाळ तसेच बाळाची सुरक्षा यांचा विचार करता अभिनेत्रीने संपूर्ण १९ महिने फक्त घरी शिजवलेले आईच्या हातचे अन्न खाल्ले. त्यामुळेच आता तिने  हॉटेलमधले जेवणाचा आनंद घेऊन स्वत:ला एक अत्यंत आवश्यक ट्रीट देण्याचे ठरवले. हे अन्न अत्यंत स्वच्छतापूर्वक आणि सुरक्षिततेसह तयार केले गेलेले होते.

अमृता राव म्हणाली, "मातृत्व म्हणजे समायोजन आणि त्याग. तरीही आईपणाचा हा सर्वोत्तम आणि गोड अनुभव नेहमीच हवा हवासा वाटतो. लॉकडाऊन आणि बाळाच्या सुरक्षिततेमुळे मी एवढे दिवस घरचेच निरोगी अन्न जेवत होते आणि आता पूर्ण १९ महिन्यांनंतर मी जेव्हा हॉटेलमध्ये इटालियन फूडची प्लेट पहिली तेव्हा एखाद्या लहान मुलासारखा माझ्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.

२०१६ मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले होते. ट्विटरद्वारे ही बातमी सांगत तिने तिच्या फॅन्सना धक्का दिला होता. लग्न करण्यापूर्वी अमृता आणि अनमोल यांनी जवळजवळ एकमेकांना सात वर्षं डेट केले. पण त्यांनी ही गोष्ट सगळ्यांपासून दडवून ठेवली होती.

अमृता आणि अनमोलची भेट अमृताच्या एका मुलाखतीच्या दरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. पण सुरुवातीला केवळ त्यांच्या दोघांमध्ये मैत्री होती. पण त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याच दरम्यान त्या दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले असे म्हटले जाते.

टॅग्स :अमृता अरोरा