Join us

Amruta Fadnavis : “द लव्ह ऑफ माय लाईफ...”, अमृता फडणवीस यांची लेकीसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:38 PM

Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक दिविजा हिचा आज वाढदिवस. दिविजाच्या वाढदिवसानिमित्त अमृता यांनी लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. अमृता एक बँकर आहेत. गायिका म्हणून त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडिया अमृता आपल्या कामाचे, कुटुंबीयांचे फोटो शेअर करताना दिसतात. आता त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. होय, आज देवेंद्र फडणवीसअमृता फडणवीस यांची लेक दिविजा हिचा आज वाढदिवस. दिविजाच्या वाढदिवसानिमित्त अमृता यांनी लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

“Wishing a very #happybirthday to my  heartbeat, my pumpkin, my munchkin, my sugarplum, sweetie pie, my bacchuda...the love of my life !!!”, असं अमृता यांनी पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्शे लिहिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला महाराष्ट्रासाठी समर्पित केलं, त्यावेळी मी माझ्या मुलीला एकटीने अगदी सिंगल मदरसारखं वाढवलं, असं अमृता यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर, कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. नुकतंच ‘अज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ हे अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज झालं. त्यांचं हे गाणं  सुपरहिट ठरलं. युट्यूबवर या गाण्याला ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. या आधी देखील त्यांची काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.  

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीस