Join us

'अलग मेरा ये रंग है...' अमृता फडणवीसांचे नवं गाणं रिलीज, पहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 17:36 IST

अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या गाण्यांमुळे चर्चेत येत असतात. त्यांची गाणी नेहमीच रसिकांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यात आता अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने या गाण्याचा पहिला व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. ‘अलग मेरा ये रंग है…’ असे या गाण्याचे बोल आहेत .ॲसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं जोरदार व्हायरल होत आहे.

या गाण्याच्या माध्यमातून अॅसिड हल्ला पीडितांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. अभिनेत्री डोनल बिश्त हिच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांत चार लाखांहून अधिक वेळा हे गाणे पाहिले गेले आहे. आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी अनेक कार्यक्रम आणि अल्बममध्ये गाणी गायली आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबतही अमृता यांनी एक अल्बम रेकॉर्ड केला होता. मध्यंतरी सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्या डान्सचा व्हीडिओही व्हायरल झाला होता. 

टॅग्स :अमृता फडणवीस