Join us

आयुषमान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल २'च्या पोस्टरवर अमृता खानविलकरची कमेंट, म्हणाली, "अरे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:26 IST

आयुषमान खुरानाने शेअर केलं 'ड्रीम गर्ल २'चं नवीन पोस्टर, अमृता खानविलकरच्या कमेंटने वेधलं लक्ष

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना त्याच्या आगामी 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. आता आयुषमानच्या 'ड्रीम गर्ल २'चे नवीन पोस्टर समोर आलं आहे. आयुष्मानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाचं नवीन पोस्टर शेअर केलं आहे. 'ड्रीम गर्ल २'च्या या नवीन पोस्टरने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 

'ड्रीम गर्ल २' या सिनेमात आयुषमान मुख्य भूमिकेत आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्लचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटात आयुषमान दुहेरी भूमिकेत आहे. आयुषमान या चित्रपटात स्त्री व्यक्तिरेखा साकारतानाही दिसणार आहे. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरवर आयुषमान आणि त्याचं स्त्री वेशातील पात्र दाखविण्यात आलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही यावर कमेंट केली आहे. 

"मला राजकारणात यायचं आहे", केदार शिंदेंचं वक्तव्य, म्हणाले, "राज ठाकरेंसाठी..."

आयुषमान खुरानाचा 'ड्रीम गर्ल २'मधील लूक अमृताच्या भलताच पसंतीस पडला आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट केली आहे. अमृताने कमेंट करत "अरे कोणीतरी शिट्टी वाजवा" असं म्हटलं आहे. अमृताच्या या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

'ओपेनहायमर'मध्ये इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन, 'महाभारत' फेम अभिनेता म्हणाला...

आयुषमान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल २'बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. हा चित्रपट २५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :आयुषमान खुराणाअमृता खानविलकरबॉलिवूड